शेकापचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सांगोल्यात पदयात्रा

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि.14 नोव्हेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती शेकापचे शहर चिटणीस अॅड.भारत बनकर यांनी दिली. सदरच्या पदयात्रेत डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख हे सहभागी असणार आहेत.
सदरची पदयात्रेची सुरुवात तेली गल्ली येथील अंबिकामंदिरापासून करण्यात येणार आहे. पत्रयात्रा तेलीगल्ली, दक्षता हॉस्पीटल समोरुन बुरुडगल्ली, वज्राबादपेठ, इंदिरानगर, संजयनगर, ढेरे वसाहत, धनगर गल्ली, सनगर गल्ली, साठे नगर, भीगनगर या परिसरातून काढण्यात येणार आहे.
तरी सांगोला शहर व परिसरातील महाविकास आघाडी-इंडिया अलायन्समधील सर्व मित्रपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.