लक्ष्मीनगर येथे घरासमोर बांधलेल्या 7 शेळ्या, बोकड व चार लहान पिल्लांची चोरी
घरासमोर बांधलेल्या 7 शेळ्या, 1 बोकड व चार लहान पिल्ली अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असल्याची घटना मौजे लक्ष्मीनगर, बाडमळा ता. सांगोला येथे दि 13 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. चोरीची फिर्याद लक्ष्मण बाड यांनी दिली आहे.
दि. 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मोठ्या सात शेळ्या, एक बोकड, चार पिल्ली वागरला बांधली होती. दि.14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या 5.30 वाजता घरातून बाहेर आल्यानंतर रात्री बांधलेल्या शेळ्या दिसून आली नाही. त्यानंतर फिर्यादी लक्ष्मण बाड, शंकर नरळे, रविंद्र बाड, रामचंद्र बाड यांनी अकलूज येथील बाजारात तसेच कोल्हापूर (वडगाव) या दोन बाजारात जावून शेळ्याचा शोध घेतला परंतु शेळ्या मिळून आल्या नाहीत. त्यावेळी शेळ्या, बोकड, व पिल्ली कोणीतरी मुद्दाम लबाडीने चोरून नेल्या असल्याची खात्री झाल्याने सांगोला पोलीस ठाणे येथे चोरीची तक्रार दाखल केली आहे.