हातीद येथे “कर्मयोगी” “आबासाहेब” या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात…

सांगोला तालुक्यातील हातीद येथे भाग्यविधाते चे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या बहुप्रतिक्षित “कर्मयोगी” “आबासाहेब” या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रीकरणामुळे जुनोनी कोळा हतीद परिसरातील नागरिकांनी गर्दी केले असल्याचे दिसून येत आहे.
दिग्दर्शक शेख यांनी यापूर्वी त्यांनी बेडा बीएफ, बेतुका, कम ऑन विष्णु, ब्रेक डाऊन, धारावी कट्टा असे एकाहून एक सरस चित्रपट बनविले असून आता कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. सोलापूर मधल्या सांगोला तालुक्याचे, महाराष्ट्रच नाही तर भारतभर प्रसिद्ध आणि अकरा वेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आदरणीय भाई आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर ह्या चित्रपटाची निर्मिती होत आहे. ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका अनिकेत विश्वासराव यांची तर सह कलाकार हर्षद जोशी, विजय पाटकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, अभिनेत्री निकिता सुखदेव, सैराट फेम अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, प्रदीप वेलणकर, अनिल नगरकर, छोटा पुढारी, वृंदा बाळ हे चंदेरी दुनियेतले तारे-तारका वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत.
प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, यांनी संगीत दिले आहे तर गाणी बॉलीवूड सिंगर कुणाल गांजावाला आणि मनीष रांजणे यांनी गायली आहेत. छाया चित्रकार, कुमार डोंगरे, स्टील फोटोग्राफर राजेंद्र कोरे कस्टम डिझायनर संगीता चौरे पोर्णिमा मराठा एक्झिक्युटिव्ह प्रोडूसर अमजदखान शेख हे आहेत.
या चित्रीकरणास शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, बाळासाहेब एरंडे, (मालक), मारुती बनकर (आबा) उल्हास धायगुडे, विष्णू देशमुख, जगदीश कुलकर्णी यांच्यासह अनेक नेते मंडळी पदाधिकारी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले या मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट यांची आहे. सांगोल तालुका आणि हातीद येथील पूर्ण गावातील आणि आबासाहेबांच्या चाहत्यांचे प्रेम व सहकार्य सुद्धा चित्रीकरणादरम्यान लाभत आहे.