वाढेगांव येथे उद्यापासून यल्लमादेवीच्या यात्रेचे आयोजन

वाढेगांव दि.४ – वाढेगांव ता. सांगोला येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही यल्लमादेवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दि. ५ रोजी देवीच्या बोनी असून संध्याकाळी ९ वा. देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच मंगळवार दि. ६ रोजी सकाळी देवीची नित्यपूजा त्यानंतर देवीची पालखी  गावांत दर्शनासाठी येणार आहे. दुपारी १ वा. किचाच्या कार्यक्रमाने यात्रा उत्सवाची सांगता होईल असे यात्रा कमिटीच्यावतीने सांगण्यात आले. तरी सर्व भाविकानी या यात्रा उत्सवास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button