महूद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन.

जि.प.प्रा.शाळा महूद बुद्रुक येथे आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक वि.म.जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना उपशिक्षिका पाटणे मॅडम यांनी हुशार भीमा ही त्यांची कथा सांगितली.ग्रंथालयामध्ये सुक्या पावाचा खाताना आवाज होऊ नये म्हणून स्वस्त असलेला पाव पाण्यात भिजवून खाऊन ते कशाप्रकारे ग्रंथ वाचन करत होते ते त्यांनी सांगितले.
द-याबा येडगे सर यांनी आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी केलेले कार्य थोडक्यात सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये कुमारी वैशाली जनार्दन हजारे, तेजस्विनी नैनेश कांबळे, क्रिश बाळू गायकवाड या सातवीच्या विद्यार्थ्यांनी तर पार्थ प्रशांत सावंत,अनुष्का निलेश महाजन,कार्तिकी काशिलिंग कोळेकर या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांबद्दल भाषणे केली.शाळेतील उपशिक्षिका संगीता केसकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पेन बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले.