सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचे रंगोत्सव स्पर्धेत घवघवीत यश.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये इंटरनॅशनल लेवल रंगोत्सव स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्या सौ.शीलाकाकी झपके,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.उमा उंटवाले,रोटरी क्लब सदस्या सौ. मंगल चौगुले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडम, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.तत्पूर्वी कै.गुरूवर्य बापूसाहेब व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला.
मुंबई रंगोत्सव सेलिब्रेशन यांच्या अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये चित्रकला, मुद्रा चित्रण, हस्ताक्षर या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल मधील एकूण 70विद्यार्थ्यांनी गोल्ड, सिल्व्हर, ब्रांझ मेडल व ट्रॉफी या स्वरूपात बक्षीस संपादन करून विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडम यांना उपक्रमशील मुख्याध्यापिका व कलाशिक्षिका कु. पल्लवी थोरात यांना कलाश्री ॲवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
या वेळी सौ.शीलाकाकी झपके यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या अभ्यासाबरोबर अशा स्पर्धा व उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. अधिकाधिक प्रगती करावी असे सांगून यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे बक्षीसवाचन लता देवळे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन कु. पल्लवी थोरात यांनी केले व कु. दिपाली बसवदे यांनी शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री.प्रबुध्दचंद्र झपके सर, संस्थासचिव श्री. म.शं.घोंगडे सर, सहसचिव श्री. प्रशुध्दचंद्र झपके साहेब व सर्व संस्थासदस्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.