आर्थिक अडचणीवर मात करत शेतकरी सहकारी सूत गिरणीचे उत्पादन सुरु- चेअरमन डॉ. प्रभाकर माळी

सांगोला(प्रतिनिधी):-चालू कापूस हंगाम 2022-23 मध्ये सध्या कापसाचे दर प्रती खंडी 65000/- ते 70000/- च्या आसपास आल्याने संचालक मंडळाने गिरणी चालू करण्याचा निर्णय घेतला व काल मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी श्रीमती रतनताई देशमुख यांच्या शुभहस्ते सूत गिरणीच्या उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. येत्या 2/3 महिन्यात सूत गिरणी पुर्ण क्षमतेने चालवून मार्च 2023 पर्यंत लवकरच गिरणी नफ्यात आणण्याचा मानस चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांनी यावेळी व्यक्त केला.
नवीन संचालक मंडळाने या बाबींवर सर्वकष विचार करून सोलापूर व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सहभाग योजने अंतर्गत रुपये 10/- कोटी कर्ज मंजूर करून घेतले असून त्यापैकी रुपये 5/- कोटी अल्प मुदत कर्ज घेवून सूत गिरणी चालू करण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे.
शेतकरी सहकारी सूत गिरणीसुध्दा या परिस्थितीमुळे माहे एप्रिल 2022 पासून आर्थिक तोटयात येवू लागली व तोटयात दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत राहिल्याने गिरणी चालविणे व्यवस्थापनास कठीण झाले. त्यामुळे दिनांक 11 ऑगस्ट 2022 पासून सूत गिरणीचे उत्पादन बंद ठेवले होते असे त्यांनी सांगितले. याच दरम्यान सूत गिरणीची पंचवार्षिक निवडणूक सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीकरीता बिनविरोध संपन्न झाली के भाई गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या सूत गिरणीची बिनविरोध निवडणूकीची परंपरा संस्थेच्या सभासद, हितचितक व सर्व कार्यकर्त्यांनी यावेळसही कायम राखली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. सौ. निकिताताई देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच सूत गिरणीचे व्हाईस चेअरमन अॅड्.नितीन गव्हाणे, संस्थेचे संचालक सर्वश्री अण्णासाहेब देशमुख, चंद्रकांतदादा देशमुख, बाबासो करांडे, अंकुश बागल, विश्वंभर काशिद, मधुकर कांबळे, दिलीप देशमुख, कुडलिक आलदर, बाळासाहेब बनसोडे, सागर लवटे, सौ.ताई मिसाळ तसेच माजी संचालक अंकुश येडगे, अवधुत कुमठेकर, नामदेव गेजगे, शे.का. पक्षाचे तालुका चिटणीस दादासो बाबर, माजी शे.का.प. तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे, पंचायत समिती माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी उपसभापती नारायण जगताप, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन विलास देशमुख, संचालक रफिक तांबोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण माळी, महिला सूत गिरणीच्या व्हाईस चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आशांक चांदणे, अरुण पाटील, चार्टर्ड अकौंटंट के.एस.माळी, शेकाप कार्यकर्ते अॅड. विशालदिप बाबर, नारायण पाटील, मोहन पवार, पांडूरंग पांढरे, सुनिल चौगुले, गोविंद माळी, संजयनाना इंगाले, आप्पासो इंगोले-पाटील, सुर्यकांत सावंत, शिवाजी मिसाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सूत गिरणीचे कार्यकारी संचालक संजयकुमार अनुसे यांनी सूत गिरणीच्या उत्पादन विभागाची तांत्रिक माहिती दिली. यावेळी सूत गिरणीचे अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.