नाझरा विद्यामंदिर प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व दहावी पालक सभा संपन्न

नाझरा(वार्ताहार):- नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रशालेचे पालक माजी सुभेदार आगतराव चौगुले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन सोमेवाडी चे पोलीस पाटील हणमंत खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सिमरन काझी यांच्यासह सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.त्यानंतर दहावीच्या वर्गासाठी पालक सभा संपन्न झाली.या सभेचे प्रास्ताविक दीपक शिंदे यांनी केले तर सोमनाथ सपाटे यांनी इयत्ता दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनात किती महत्त्वपूर्ण आहे. याबाबत मार्गदर्शन केले.पालकांमधून आगतराव चौगुले,दत्तात्रय आदाटे, सिद्धेश्वर शेळके,तुकाराम बनसोडे, महादेव बनसोडे,दत्तू शेळके,हणमंत खांडेकर,हरी आदट व स्वाती यादव यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक करत काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांनी पालकांच्या सर्व सूचनांवर सविस्तर मार्गदर्शन केले व दहावीच्या परीक्षेस सामोरे जाताना पालकांची भूमिका काय असावी, विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे कसे लक्ष दिले जावे व त्याबरोबरच विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास कशा पद्धतीने होईल याबाबत विस्तृत मनोगत व्यक्त केले.या पुढील काळात पाचवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालक सभा संपन्न होणार आहेत.या पालक सभेचे सूत्रसंचालन सूर्यकांत कांबळे यांनी केले तर आभार चंद्रशेखर लिगाडे यांनी मानले.पालक सभा यशस्वी करण्यासाठी पालक शिक्षक सभेचे प्रमुख सोमनाथ सपाटे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.