सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचा शाळा अंतर्गत आणि शाळा बाह्य स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ उत्साही वातावरणात संपन्न झाला.या वेळी प्रथमच हा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षक पालक संघातील सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे, प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे,पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर, शिक्षक पालक संघातील सदस्य गणेश सासणे, सोमनाथ येवले, सदस्या स्वाती मस्के, प्रज्ञा नाझरकर, अश्विनी महिमकर,माधवी खडतरे, रुपाली तंडे, अलका वेदपाठक, अनिता पाटील, लक्ष्मी कोरे, लता माळी आदि मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे शिक्षक पालक संघातील सदस्य पूजन गणेश सासणे तर कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके आणि बाई साहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षक पालक संघातील महिला सदस्या स्वाती मस्के, प्रज्ञा नाझरकर, सौ.सासणे, अनिता पाटील,लक्ष्मी कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. छोटा शिशू ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची बक्षीसे या वेळी देण्यात आली.
या वेळी पालक संघातील सदस्या प्रज्ञा नाझरकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाने कमी कालावधीत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम बहारदार झाला असून विद्यालयातील शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.असे सांगून आमच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करुन आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल विद्यालयाचे आभार मानले आणि येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असा सल्ला दिला.
सदर कार्यक्रमाचे बक्षिस वितरण वाचन इकबाल शेख, नानासाहेब घाडगे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ साठे यांनी केले तर आभार नानासाहेब घाडगे यांनी मानले.