सांगोला तालुका

लोकदैवत आरेवाडीच्या श्री. बिरोबा यात्रेला प्रारंभ; कमलापुरातील बंडगर परिवाराची 165 वर्षाची परंपरा कायम

 पश्चिम महाराष्ट्रातील आराध्य दैवत  कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडीचा बिरोबा  देवस्थान आरेवाडीच्या जत्रेला प्रारंभ झाला असून महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा या भागातून अनेक भाविक भक्त श्रद्धेने आरेवाडीच्या बिरोबाला येतात. सांगोला तालुक्यातील अनेक लोक भक्त मंडळी परंपरेने बैलगाडीने यात्रेला सहपरिवार सहकुटुंब जातात विशेषता कमलापूर गावातील बंडगर परिवारांनी आजही ही  165 वर्षाची परंपरा जपलेले आहे हे विशेष.
 बैल बैलगाडी यामध्ये श्री.जगन्नाथ मारुती बंडगर,त्यांचे चुलत भाऊ बिरा दादू बंडगर वयाच्या नव्वदीतही ,रामचंद्र पांडुरंग बंडगर, बाबुराव नामदेव बंडगर, शामराव पांडुरंग बंडगर, तानाजी जगन्नाथ  बंडगर ही परंपरा जपतात.गाडी सजवून- धजवून सर्व लोक आरेवाडीला जातात.सांगोला तालुक्यातील कमलापूर गावातील बंडगर परिवारांनी मोठ्या धुमधडाक्यात फटाक्याच्या आतिषबाजीने, बैल व गाडी सजवून अगदी वाजत गाजत आरेवाडीच्या बिरोबाला देवस्थानाकडे मार्गस्थ झाले. घरामध्ये आनंदमय वातावरण असते.परंपरा जपणार आहे बोलकं चित्र वरील फोटो मधून दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!