उत्कर्ष पूर्व प्राथमिक विभागात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

सांगोला:- उत्कर्ष पूर्व प्राथमिक विभागात दिंडी सोहळा १६ जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सगळीकडे रांगोळी घालण्यात आली होती. यामध्ये वारकरी वेषात बहुसंख्य जन तर कोण जनाबाई संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संतज्ञानोबा माऊली असे एक ना अनेक संत आले होते. सगळ्यांच्या हातात पताके होते कोणी टाळ आणले होते.
मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता ही मुले खरोखरच पंढरपूरला चालली आहेत की काय असे वाटत होते. शाळेच्या प्रांगणात पालखी ठेवण्यात आली होती पालखीचे पूजन उत्कर्ष पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मधुरा शास्त्री व सर्व शिक्षीकाच्या यांच्या हस्ते करण्यात आले.
आमचा विठोबा आमची रखुमाई असा जयघोषातच उत्कर्ष शाळा दणाणून गेली होती. ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असा जयघोष करात ही दिंडी शाळेच्या सभागृहात प्रस्तान झाली. सभागृहात रिंगण घालण्यात आले. तिथे मुलांनी व ताईंनी फुगड्या घातल्या. पालकांचे खूप मोठे सहकार्य लाभले.दिंडीचा खाऊ खाऊन विठ्ठलाच्या जयघोषात आनंदात मुले घरी गेली.



