क्राईमसांगोला तालुका

चोरीस गेलेल्या 26 मोटारसायकली सांगोला पोलिसांकडून जप्त

सांगोला (तालुका प्रतिनिधी) सांगोला पोलीसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करुन २६ दुचाकी हस्तगत करून एकुण ११ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सांगोला पोलीस स्टेशनच्या हददीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्हयांचा तपास करीत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून संशयीत आरोपी महंमदहुसेन साहेब शेख , संतोष  शिंगे  यांस मिरज येथुन ताब्यात घेवून त्यांना सदर गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता सदर आरोपीने मिरज, कागवाड व इतर जिल्हयातुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन १५ दुचाकी चोरल्याचे कबुली देवुन त्या मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे विक्री केल्याचे सांगीतले व त्याच्याकडून पोलिसांनी १५ दुचाकी हस्तगत केल्या आहे सदर जप्त करण्यात आलेला मुददेमाल हा अंदाजे ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा आहे . तसेच स.पो.नि. प्रशांत हुले गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पो.हे कॉ वजाळे , पो.ना मोहोळकर , पो.ना. पाटील ,पो.कॉ. काशीद यांनी संशयीत आरोपी सोपान वैजिनाथ वगरे , ज्ञानेश्वर बुरंगे,अमोल वगरे  यांना सदर गुन्हयात अटक करून अधिक तपास केला असता सदर आरोपीनी सोलापुर व इतर जिल्हयातुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन ११ दुचाकी चोरल्याचे कबुली देवुन त्या सांगोला तालुक्यातील जवळा , बुरंगेवाडी , तरंगेवाडी येथे विक्री केल्याचे सांगीतल्याने आरोपीने सांगीतले प्रमाणे २ लाख ८० हजार रुच्या ११ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे . पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपीकडून एकुण २६ मोटरसायकली जप्त करून ११ लाख १५ हजार रू . किंमतीचा चोरीस गेलेला मुददेमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे . सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे  ,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.हिम्मत जाधव सो , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम ,  पोनि श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली , स.पो.नि. नागेश यमगर , सपोनि प्रशांत हुले , पोहेकॉ दत्ता वजाळे , पोना अभिजीत मोहोळकर , पोना बाबासाहेब पाटील , पो.ना. मेटकरी , पो.ना. नलवडे , पो.कॉ. सांवजी , पोकॉ संभाजी काशीद ,युसुफ पठाण यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!