एल.के.पी. मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे सांगोल्यात आगमन

संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली आणि सुमारे 15 शाखांच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेली एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या सांगोला येथील शाखेचा व कार्पोरेट ऑफिसचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता नेहरू चौक सांगोला येथे संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. अर्थविश्वातील आघाडीची असलेल्या एका मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे आगमन सांगोल्यामध्ये होत असल्यामुळे शहर व परिसरामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्रातील या मानदेश परिसरामध्ये पंढरपूर पाण्याचं, मंगुड दाण्याचं आणि सांगोला सोन्याचं अशी एक प्रसिद्ध म्हण फार पूर्वीपासून प्रचलित आहे. सोन्याचं सांगुल म्हणून प्रसिद्ध असलेले व फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे सांगोला शहर , तालुक्यातील लहान मोठ्या मिळून शंभरहून अधिक गावांशी संलग्न असलेली एक फार मोठी व्यापार पेठ आहे. या मल्टीस्टेट मुळे इथल्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना आर्थिक उलाढालीसाठी आणि विविध प्रकारच्या कर्जासाठी उत्तम सोय होणार आहे. आरटीजीएस, NEFT त्याचबरोबर IMPS सुविधा देखील येथे उपलब्ध होणार आहेत. आपल्या बचत खात्यावरील रकमेवर सुद्धा पाच टक्के वार्षिक व्याजदर मिळणार आहे.
सहकार विश्वातील विश्वासनीय परिवार म्हणजे सूर्योदय उद्योग समूह — सूर्योदय हे नाव सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण मानदेशी परिसरामध्ये विविध उद्योग– व्यवसायांच्या माध्यमातून लोकप्रिय आहे. संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांचे बरोबरच सह संस्थापक सर्वश्री डॉ. बंडोपंत लवटे , जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी यांच्या अथक परिश्रमातून अनेक संस्था उभारल्या गेलेल्या आहेत . सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तसेच सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून हा परिवार सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सुपर सूर्योदय ऍग्रो अँड मिल्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून दुधाच्या क्षेत्रामध्ये या उद्योग समूहाचे मोठे काम असून या उद्योग समूहाचे खर्डी तालुका पंढरपूर, लवंगी तालुका मंगळवेढा तसेच सांगोला तालुक्यामध्ये घेरडी , बुरलेवाडी व मेडशिंगी या ठिकाणी चीलिंग प्लांटच्या शाखा आहेत. सूर्योदय शूटिंग शर्टींग, सूर्योदय लिनन हाऊस, सूर्योदय ब्रँड लुक मेन्स वेअर , सूर्योदय ज्वेलर्स, दुग्धालय, सूर्योदय मोबाईल शोरूम आणि सूर्योदय अँड कंपनी अशा विविध उद्योगांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून हा उद्योग समूह सक्रिय आहे. या सूर्योदय उद्योग समूहाचे अर्थ विश्वातील अग्रगण्य पाऊल म्हणजे एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही संस्था आहे. \
ठेवीला सुरक्षा व आकर्षक व्याजदर — इथे नांदते लक्ष्मी, देते विश्वासाची हमी हे ब्रीद घेऊन वित्तीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या या मल्टीस्टेट संस्थेकडून ग्राहकांना ठेवीवर वार्षिक 12 टक्के व्याजदर दिला जात असून, 46 ते 90 दिवसांकरिता सात टक्के , ९१ ते १८० दिवसांकरिता 8% , 181 ते 364 दिवसांकरिता दहा टक्के , 13 महिने ते 24 महिन्यांकरिता साडेअकरा टक्के आणि 24 महिन्यांपासून पाच वर्षापर्यंत साडेबारा टक्के अत्यंत आकर्षक व्याजदर असून ज्येष्ठ नागरिक ,अपंग व्यक्ती, विधवा भगिनी, संत महंत, माजी सैनिक तसेच महिला भगिनी यांच्याकरिता चालू व्याजदरापेक्षा अर्धा टक्के जादा व्याजदर असून 24 महिन्यांच्या पुढे तब्बल 13 टक्के वार्षिक व्याजदर या संस्थेकडून देण्यात येत आहे.
आकर्षक लाभ देणाऱ्या इतर काही विश्वसनीय योजना— एलकेपी दाम दुप्पट ठेव योजना, एलकेपी दाम दीडपट ठेव योजना, एलकेपी दाम तिप्पट ठेव योजना तसेच एलकेपी दाम चौपट ठेव योजना .
कर्ज व इतर विशेष सुविधा- व्यावसायिक कर्ज, पिग्मी कर्ज ,वैयक्तिक कर्ज ,सोनेतारण कर्ज याबरोबरच मोबाईल बँकिंग आणि QR कोड तसेच एटीएम सुविधा देखील येथे उपलब्ध आहे. या संस्थेचे सभासद होऊन सुमारे दोन लाखांचा अपघाती विमा आपण मोफत मिळवू शकतो. तसेच संस्थेच्या कामकाजाची वेळ ग्राहकांना अत्यंत सोयीची ठरेल अशी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. या मल्टीस्टेटच्या रविवारी संपन्न होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.