सांगोला तालुका

आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ब्लॅंकेट वाटप

सांगोला. (प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ऊस तोडणी मजुरांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेच्या वतीने दरवर्षी ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम केला जातो. यावर्षी बीड जिल्ह्यातील गेवराई आणि धारूर या ठिकाणाहून केदार मळा वासूद येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस तोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शनी गल्ली येथे राहणाऱ्या चव्हाण कुटुंबीयांनाही ब्लॅंकेट देण्यात आले.

 


थंडीत ऊस तोडणीचे काम करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांची संख्या भरपूर आहे. कडाक्याच्या थंडीत काम करणारे मजूर सध्या सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्यांच्यापैकीच काही कुटुंबाला ब्लॅंकेट देऊन आपुलकीने मायेची ऊब देण्याचे काम केले आहे.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सहसचिव शरणप्पा हळळीसागर, अरविंद केदार, महादेव दिवटे, हरिभाऊ जगताप गुरुजी, निलकंठ लिंगे, सुरेशकाका चौगुले, दादा खडतरे, इंजि. विकास देशपांडे, संजय गव्हाणे, अशोक भोसले, संजय केदार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!