सांगोला तालुका

मा.दीपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी व्याजदराने प्राथमिक शिक्षकांना पतपुरवठा करुन अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या सांगोला येथील मा.दीपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या २०२२ ते २०२७ सालासाठीची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे या पतसंस्थेची बिनविरोध निवडीची परंपरा याही वेळेला कायम राहिली. संचालक म्हणून संजय गायकवाड-सांगोला, मोहम्मद रफीक शेख-वाकी(घे), विलास डोंगरे-सांगोला, गोविंद भोसले-चिंचोली, महादेव नागणे-महूद हे सर्वसाधारण प्रवर्गातून नूतन संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले तसेच महिला प्रतिनिधी सौ. कमल खबाले-महूद व सौ पल्लवी मेणकर-महाजन महूद या संचालक पदी निवडून आलेल्या आहेत तसेच इ.मा.व. प्रवर्गातून कुमार बनसोडे-नाझरा, भ.ज. गटातून वसंत बंडगर-जवळा व अ.जा. गटातून तानाजी साळे-जवळा यांची वर्णी संचालक पदी लागली आहे. निवडणूक बिनविरोध पार पडून नवीन संचालक मंडळ मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संचालक मंडळाच्या निवडीसाठी गुलाबराव पाटील,सुहास कुलकर्णी, संजय काशीद पाटील, केशवराव घोडके, विकास साळुंखे, विश्वंभर लवटे, रफिक मुलाणी, मोहन अवताडे,सुमन बगले, राजेश्वरी कोरे या सर्वांनी प्रयत्न केले यासाठी बाबासाहेब इंगोले, कैलास मडके, दिलीप घाडगे, युवराज मागाडे,दादासाहेब जगताप, सावित्रा कस्तुरे-हवेली या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी संतोषकुमार निंबाळकर, मारुती काळेबाग महादेव सुरवसे, बाळासाहेब बनसोडे, भास्कर महाजन, अंजली बिराजदार-उकळे ,सचिव अमर कुलकर्णी सह सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!