महुद गावात झालेले प्रवेश म्हणजे दिशाभुल…शेकापचे कार्यकर्ते आजही निष्ठावंतच—- बाळासाहेब ढाळे

मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी मोठ्या धुमधडाक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश म्हणुन वातावरण तापवण्यात आले.ढाळेवाडी यांच्या येथील १६० कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होणार ..होणार..आशा बातम्या पेरण्यात आल्या प्रत्यक्षात मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाशी अजीबात गद्दारी केली नाही..पक्ष बदलायचा विचारसुद्धा मनामध्ये आणला नाही.
जे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात गेलेत ते का गेलेत?कशासाठी गेलेत? त्यांना का घेतलं गेलय?आशा प्रश्नाची चर्चा मसुदा मध्ये जोरात सुरू आहे.. आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाने कित्येकांना कुवत नसताना महत्वाची पदे देऊन मान सन्मान मिळवुन दिला.माझेच उदाहरण घ्यायचे झाले तर मला सरपंच पदांची संधी मिळाली व मला कासाळगंगा नदी पुनर्जीवन कामामध्ये सहभाग नोंदवता आला .. राज्यस्तरीय काम करण्याची जबाबदारी मिळाली अनेक पुरस्कारांनी मला व आपल्या ग्रामपंचायतीला गौरवण्यात आले हे फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच घडु शकते..अशी अनेक उदाहरणे देता येतील.
सध्या ज्यांनी प्रवेश केला त्यांनाही मान सन्मान मिळाला आहे..तसा मान सन्मान अनेकांना मिळाला आहे.. मात्र सत्तेची हवा डोक्यात शिरली कि विचाराला तिलांजली देऊन काही लोक भरकटतात.आशा गोष्टीचा निर्णय घेताना सारासार विचार करून निर्णय घेणे गरजेचे असते.कारण पद हे कायमस्वरूपी नसते मान सन्मान पद गेले तरी तसाच राहीला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे.समाजामध्ये सन्मानाने व ताठ मानेने फिरता आले पाहिजे हे राजकारणात कमवायचे असते.. स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत हे सतत लक्षात ठेवले पाहिजे..चुका झाल्या तरी सुधारल्या पाहीजेत आपले नेते डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत काम करीत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असो
या प्रवेशाने हे सिध्द झाले कि शेकापक्षाचा मतदार , कार्यकर्ता सहजासहजी कोणाच्या मागे फरफटत जातं नाही तो निष्ठावंत आहे याची प्रचिती आली जे पक्ष सोडून गेले ते चार ते पाच लोक त्यांच्या बरोबर ढाळेवाडीतील एकही निष्ठावंत कार्यकर्ता गेला नाही ही शेकापक्षाची विचारधारा आहे.ज्यांनी प्रवेश केला त्यांच्या घरातील सुध्दा लोक सोबत गेले नाहीत कारण ते स्व आबासाहेबांवरती नितांत श्रध्दा आजही ठेवून आहेत.जे बोटावर मोजण्याइतके गेले ते का गेलेत हे ही जगजाहीर आहे.. विशेषतः आशा काही लोकांचे प्रवेश करुन घेतले ते कोणत्या पक्षात होते हा संशोधनाचा विषय आहे त्यातील बहुतांश लोक हे मुळात त्यांचेच असताना त्यांचा प्रवेश का करून घेतला हे समजले नाही महिमधील प्रवेश तर अक्षरशः हास्यास्पद होते…यादी वाडवण्याच्या नादात कदाचीत हे झाले असेल असो
एकमात्र खरे आहे स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब अकरा वेळा आमदार असताना निधीचे गाजर दाखवून किंवा कमीशनची आशा दाखवुन त्यांनी पक्षप्रवेश करुन घेतले नाहीत.परंतु सध्याचे गल्लीच्छ राजकारण पहाता आसे प्रकार अपेक्षीत आहेत.परंतु मोठा गाजावाजा करीत केलेले पक्ष प्रवेश म्हणजे नुसती दिशाभुल असल्याचे मत माजी सरपंच बाळासाहेब ढाळे यांनी व्यक्त केले