सांगोला तालुका

इनरव्हील क्लब यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू साठी अर्थीक मदत 

सांगोला (प्रतिनिधी):- इनरव्हील क्लब  ऑफ सांगोला त्यांच्याकडून सावित्रीबाई फुले प्रशाला सोनंद या स्कूलची आठवीची विद्यार्थिनी कु.सिद्धेश्वरी लालासो काशीद हिची सिकई मार्शल आर्ट मधून गव्हर्मेंट राष्ट्रीय स्तरावर निवड व कराटेमध्ये इंटरनॅशनल स्तरावर निवड झाली आहे.
तिला पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नेपाळमध्ये होणाऱ्या कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला 30 हजार खर्च तिचे आई-वडील शेतकरी आहेत तिची परिस्थिती खूप हलाखीची आहे सदर खर्च करण्याची तिच्या शेतकरी आई-वडिलांची  परिस्थिती  नाही अशा वेळेला इनरव्हील क्लब ने तिला मदतीचा हात व थोडासा सिंहाचा वाटा म्हणून व अथर्व शिष्य गणेश मंडळ महिलांनी 2 हजार रुपये असे 10 हजार रुपये रोख रक्कम देऊन तिचे पुढील स्पर्धेसाठी अभिनंदन केले इनरव्हील क्लब नेहमी गरजू व्यक्तींना मदतीचा हात देते.
सदर  कार्यक्रमासाठी क्लबच्या माझी अध्यक्ष अरुणा घोंगडे व मंगल लाटणे एडिटर संगीता चौगुले अंकिता आनेकर वैशाली आंधळगावकर सोनंद शाळेतील मॅडम संगीता शेडसाळे छोटी शिवन्या सिद्धेश्वरी काशीद उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील संगीता  मॅडमनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!