पायोनियर स्कुल य.मंगेवाडी आयोजीत राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

सांगोला(प्रतिनिधी):- पायोनियर स्कुल य.मंगेवाडी या प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त भव्य राज्यस्तरीय खुला गट पुरुष व महिला मॅरेथॉन स्पर्धा उद्या बुधवार दि.28 डिसेंबर रोजी सकाळी 6 वा पायोनियर इंग्लिश मिडीअम स्कुल, सेमी इंग्लिश स्कुल व पायोनियर गुरुकुल, य.मंगेवाडी ता.सांगोला येथे आयोजीत करण्यात आल्या आहेत. दोन्ही गटासाठी स्पर्धा 7 किमी होणार आहे.
पुरुष गटातील प्रथम क्रमांक विजेत्यासाठी सरपंच श्री.बापू जावीर व मा.सरपंच श्री.संजय येलपले यांचेकडून 11 हजार 111 रुपये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, व्दितीय क्रमांकासाठी मा.उपसरपंच अमोल खरात व मा.सरपंच दत्तात्रय मासाळ यांचेकडून 7 हजार 111 रुपये, तृतीय क्रमांकासाठी उपसरपंच अनिल पाटील यांचेकडून 5 हजार 111 रुपये तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी श्री.विजय येलपले यांचेकडून 1 हजार 111 रुपये देण्यात येणार आहे.
महिला गटातील प्रथम क्रमांक विजेत्यासाठी उद्योजक शशिकांत येलपले व मा.उपसरपंच चंद्रकांत चौगुले यांचेकडून 11 हजार 111 रुपये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, व्दितीय क्रमांकासाठी प्रा.बाळकृष्ण कोकरे सर व मा.सरपंच श्री.प्रकाश सोळसे यांचेकडून 7 हजार 111 रुपये, तृतीय क्रमांकासाठी श्री.बंडु पवार यांचेकडून 5 हजार 111 रुपये तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी श्री.विजय येलपले यांचेकडून 1 हजार 111 रुपये देण्यात येणार आहे.
नाव नोंदणीची अंतिम तारीख मंगळवार दि.27 डिसेंबर 2022 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत असणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी फी 100 रुपये असणार आहे. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी मो.9665651235, 7387786898, 8975342399 या मो.नंबर वर संपर्क साधावा.
तरी या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पायोनियर स्कुल य.मंगेवाडी च्यावतीने करण्यात आले आहे.