सांगोला तालुका

सांगोला लायन्स क्लबकडून कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन; ‘आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट’ व जीवनगौरव पुरस्काराचे गुरूवारी वितरण

सांगोला (प्रतिनिधी) ‘लायन्स क्लब ऑफ सांगोला’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सन्मान कर्तृत्वाचा गौरव अमोघ कार्याचा’ अंतर्गत ‘आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट’ पुरस्कारा’चे वितरण गुरूवार दि.२९डिसेंबर २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह,सांगोला जि.सोलापूर येथे दुपारी दोन वाजता होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान होणार आहे. या पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ला.डॉ.नवल मालू संचालक लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना सन- २०१८-२०२१,ला.नरेद्र भंडारी संचालक आंतरराष्ट्रीय संघटना सन-२०१०-११ हे उपस्थित राहणार आहेत.मार्गदर्शक ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी व प्रांत ३२३४ड१ प्रांतपाल ला.राजशेखर कापसे, प्रथम उपप्रांतपाल ला.भोजराज नाईक निंबाळकर, द्वितीय उपप्रांतपाल ला.ॲड एम.के.पाटील,रिजन चेअरमन ला.गहिनीनाथ कदम,झोन चेअरमन ला.राजीव कटेकर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अमोघ कार्यासाठी ‘सन्मान कर्तृत्त्वाचा गौरव अमोघ कार्याचा’ अंतर्गत ‘आयडॉल्स सोलापूर डिस्ट्रिक्ट ‘पुरस्काराने ‘वैद्यकीय क्षेत्र’ डॉ.शीतल शहा पंढरपूर,
डॉ.एम.के.इनामदार अकलूज,
डॉ.संजय अंधारे बार्शी,
डॉ.प्रसन्न कासेगावकर सोलापूर,
डॉ.रणजित केळकर सांगोला,’सामाजिक क्षेत्र’
प्रार्थना फाऊंडेशन सोलापूर,
पालवी प्रकल्प पंढरपूर,
मातोश्री वृद्धाश्रम सांगोला,
माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था सांगोला,
आपुलकी प्रतिष्ठान सांगोला,’प्रशासकीय क्षेत्र’
भारत वाघमारे उपजिल्हाधिकारी सोलापूर,राजश्री पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा,प्रसाद मेनकुदळे, उपायुक्त, आयकर विभाग सोलापूर,मिनाज मुल्ला उपविभागीय दंडाधिकारी सातारा,सायली पाटील कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग अहमदगर, ‘औद्योगिक क्षेत्र’ नितीन बिज्जरगी सोलापूर,
विजय कादे पंढरपूर,सुदाम भोरे सांगोला,राहुल श्रीखंडे सोलापूर,अनिल इंगवले सांगोला, ‘शैक्षणिक क्षेत्र’रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी
सांगोला,फॅबटेक एज्युकेशन सोसायटी सांगोला,
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला,शिक्षण व कृषी विकास प्रतिष्ठान मेडशिंगी,
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर या व्यक्तींचा व संस्थांचा सन्मान होणार आहे. तसेच लायन्स मधील उत्तुंग कार्यासाठी ला.डॉ.नारायणदास चंडक माजी प्रांतपाल यांना ‘लायन्स क्लब ऑफ सांगोला जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

समाजाला प्रेम आणि विश्वास देऊन सामाजिक, शैक्षणिक ,आरोग्य व इतर विभागात सेवाभावी वृत्तीने विधायक काम करणाऱ्या जगातील २०० हून अधिक स्वतंत्र देशात २८५०० पेक्षा जास्त शाखा असणाऱ्या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून सामाजाच्या अभ्युदयासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.हा विचार प्रमाण मानून लायन्स क्लब ऑफ सांगोलाने ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली समाजाच्या अभुदयासाठी वेगवेगळे सामाजिक, आरोग्य ,शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये उपक्रम हाती घेऊन कार्य केले आहे. आहेत.त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात अमोघ कार्य करणाऱ्या संस्थांचा व व्यक्तींचा सन्मान हेही विधायक कार्यच आहे असे समजून हा समारंभ आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आगत्यपूर्वक उपस्थित रहावे असे आवाहन सांगोला लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण, सचिव ला.उन्मेश आटपाडीकर, खजिनदार ला.प्रा.नवनाथ बंडगर,सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

आमचे मार्गदर्शक ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके प्रांतपाल ३२३४ ड १ – २००९-१० यांचे पिताश्री सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सोय सर्वप्रथम सुरू करणारे व विद्यार्थ्यांचा गुणात्मक व रचनात्मक विकास करण्यासाठी पोटतिडकीने प्रयत्न करणारे शिक्षण महर्षी, देशभक्त ,थोर स्वातंत्रसेनानी, कै.गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्षे -२०२१-२२ निमित्त ‘सन्मान कर्तुत्वाचा गौरव अमोघ कार्याचा’ अंतर्गत ‘आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट ‘पुरस्कार देऊन विविध मान्यवरांचा व संस्थाचा सन्मान होतोय ही गोष्ट मनाला आनंद देणारी आहे .
ला.प्रा.धनाजी चव्हाण, अध्यक्ष,लायन्स क्लब ऑफ सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!