जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत शिवणे माध्यमिक विद्यालयाच्या 14 वर्षे मुलींचा संघ द्वितीय

शिवणे (वार्ताहर):-वसुंधरा कला महाविद्यालय ,जुळे सोलापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत शिवणे माध्यमिक विद्यालय शिवणे च्या 14 वर्षा खलील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
या स्पर्धेत सुरवातीला मोहोळ,मंगळवेढा व सेमी फायनलला अक्कलकोट या संघांना धूळ चारत दिमाखात फायनल मध्ये प्रवेश केल्यानंतर बलाढ्य वेळापूर(माळशिरस) संघाकडून निसटता पराभव पत्करावा लागला. व द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
तसेच या जिल्हास्तरीय स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांचा संघ सुद्धा सहभागी झाला होता.त्या संघाचा जिल्यात तृतीय क्रमांक आला आहे.
सदर दोन्ही संघास क्रीडा शिक्षक काशिलिंग शेळके ,व पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक हेमंत रायगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य विजयकुमार वाघमोडे,संस्था अध्यक्ष बबनराव जानकर, उपाध्यक्ष प्रकाशभाऊ वाघमोडे,सचिव डॉ.राजेंद्र जानकर व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.