रोटरी क्लब सांगोला यांचे वतीने कोडग वस्ती,डोंगरगाव ता. सांगोला येथे 1000 लिटरच्या पिण्याच्या पाण्याची टाकी वितरण कार्यक्रम

रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने आज दिनांक 3 डिसेंबर 2022 शनिवार रोजी कोडग वस्ती,डोंगरगाव येथे पिण्याचे पाणी साठवण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेची टाकी देण्यात आली. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या कोडग वस्ती येथे पिण्याचे पाणी साठवण्याची सोय नव्हती. ती सोय रोटरी क्लब सांगोला यांचे मार्फत करण्यात आली. यावेळी उपस्थित वस्तीवरील नागरिकांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त केला. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात याचा आम्हाला खूप उपयोग होईल असे सांगून रोटरी क्लब बाबत कृतज्ञता व्यक्त केली*
या कार्यक्रमासाठी सांगोला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. दत्तात्रय पांचाळ सर,सचिव रो इंजि. विकास देशपांडे,रो.मोहन मस्के सर,रो.इंजी. हमीद शेख,रो. इंजि.मधुकर कांबळे,रो. इंजि. बाळासाहेब नकाते सो,रो.धनाजी शिर्के,रो.डॉ. अनिल कांबळे रो.श्रीपती आदलिंगे,रो.डॉ. साजिकराव पाटील सर व कोडग वस्ती येथील श्री.राजाराम कोडग,श्री. महादेव कोडग व सर्व लाभार्थी उपस्थित होते.