सांगोला शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५५ घरकुलांच्या प्रस्तावास केंद्र शासनाची मंजुरी -आमदार शहाजीबापू पाटील

देशातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत पक्के घर असायला हवे ह्या हेतूने शहरातील गरिबांसाठी “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ” या योजनेची सुरुवात सन २०१८ साली करण्यात आली होती.
या योजने अंतर्गत आत्ता पर्यंत सांगोला नगरपालिकेला चार टप्प्यात एकूण २५१ कुटुंबांना घरकूल मंजुर करण्यात आले होते त्या पैकी आज अखेर १९५ घरकूल पूर्ण झाले असून उर्वरित घरे अंतिम टप्प्यात आली आहेत. आत्ता पाचव्या टप्प्यात नव्याने ५५ कुटुंबांना केंद्र शासनाने २६आॅक्टोबर रोजी मंजूरी प्रदान केली आहे. या घरकुल मंजुरीसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून घरकुले मंजूर करून घेतले आहेत
या योजनेत पात्र लाभार्त्याला स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे १ लाख व केंद्र शासनाचे १.५ लाख असे एकूण २.५ लाख इतके अनुदान वितरित करण्याची तरतूद असुन लाभार्थीने स्वत च्या मालकीच्या जागेत घरकुलाचे बांधकाम करून नगरपरीषदे कडून अनुदान घ्यायचे आहे. या योजनेची सांगोले नगपरिषदे मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. लाभार्थ्यांची यादी नगरपालिका कार्यालय येथे लावण्यात आलेली आहे पात्र लाभार्थ्यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी मुख्याधिकारी नगरपालिका सांगोला यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करून घ्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे