सांगोला महाविद्यालयात सेबी व भारतातील भांडवल बाजार या विषयावर परिसंवाद संपन्न

सांगोला महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी 'सेबी व भारतातील भांडवल बाजार' या
विषयावरती परिसंवाद संपन्न झाला. या परिसंवादासाठी सीडीएसएल, मुंबई येथील प्रमुख
व्याख्याते डॉ. अजित पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले हे उपस्थित होते.
डॉ. अजित पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सेबीची (भारतीय प्रतिभूती व
विनिमय मंडळ) मूलभूत कार्य, भारतातील भांडवल बाजाराचे स्वरूप व व्याप्ती, शेअर बाजार,
शेअर बाजारातील शेअर्सची खरेदी विक्रीची प्रक्रिया, यासाठी लागणारे डिमॅट अकाउंट, गुंतवणूक
कशी व कोठे करावी याविषयी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी शेअर बाजार
नेमका काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे कारण रोजगाराच्या अमाप संधी त्यामध्ये
आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात करावे असे सांगितले. त्याचबरोबर
अर्थशास्त्र व कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी नंतरच्या उपलब्ध असलेल्या असंख्य संधी
याबद्दलही माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुरेश भोसले यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त
करताना विद्यार्थ्यांनी भांडवल बाजारात असणारी रोजगार विषयक संधीची माहिती घेऊन,
त्यासाठी आवश्यक पात्रता व कौशल्ये मिळवून आपले ध्येय गाठावे असे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. डी.
वेदपाठक यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.नितीन बाबर यांनी करुन दिला. आभार प्रा.
प्रशांत गोडसे यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अर्थशास्त्र विभागातील प्रा. प्रशांत
गोडसे व प्रा. सौ. एस.एस. भुंजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे
प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या
कार्यक्रमासाठी बी.ए. व बी.कॉम. मधील 81 विद्यार्थी उपस्थित होते.