उत्कर्ष विद्यालय येथे दुकानजत्रा उत्साही वातावरणात संपन्न

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचालित,उत्कर्ष विद्यालय, सांगोला. येथे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित ‘ दुकानजत्रा उत्साही वातावरणात संपन्न झाली.
उत्कर्ष विद्यालय सांगोलाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 27 डिसेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित केले आहे यानिमित्ताने काल दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी विद्यालयात दुकान जत्रेचे आयोजन केले होते या दुकान जत्रेचे उद्घाटन माननीय केंद्रप्रमुख पटेल साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. दुकान जत्रेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या स्टॉल वरील खाद्यपदार्थाचा आस्वाद इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनमुराद घेतला. विद्यार्थ्यांचा विक्री कौशल्य वाढीस लागावं यानिमित्ताने विद्यालयाने राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे असं पालकवर्गातून बोलले जात आहे.
या उपक्रमास माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान सांगोलाच्या संस्थापिका माननीय संजूताई केळकर तसेच कोषाध्यक्षा शालिनी कुलकर्णी, ठोंबरे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मागाडे बाई तसेच दोन्ही विभागाचे पर्यवेक्षक व शिक्षकवृंद उपस्थित होता.