फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बिरासाहेब रुपनर यांची जयंती साजरी

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बिरासाहेब रुपनर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेशजी शिंदे यांच्या हस्ते स्व. बिरासाहेब रुपनर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. भाऊसाहेब रुपनर,व्हाईस चेअरमन मा.राजाभाऊ रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर प्रा.डॉ. अमित रुपनर,कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर,कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय अदाटे उपस्थित होते. महाविद्यालयीन स्तरावरील घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेशजी शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले..
यावेळी बोलताना प्रा. गणेशजी शिंदे म्हणाले कि, शिक्षणाशिवाय पर्याय नाही,शिक्षणाचा आनंद घ्या,विद्यार्थ्यांनी नाविन्यता शोधली पाहिजे,आपल्यामध्ये असणाऱ्या कल्पना आणि विचार यांना वाव दिला पाहिजे, तुमचे ज्ञान समाजभिमुख असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी व्यापक व मोठा विचार केला पाहिजे, मोठी स्वप्ने पहा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायात उतरले पाहिजे तशी हिम्मत दाखवली पाहिजे, वेगळेपण शोधले पाहिजे तसेच नाविन्यता शोधून ती स्वीकारली पाहिजे. आपल्यातील कुवत शोधली पाहिजे, गुणपत्रिकेला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे असे सांगून आयुष्यात कितीही संकटे आली तरी डगमगू नका स्व.बिरासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आयुष्यात कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही. शेवटी त्यांनी मस्त जागा,हसत रहा,छान रहा असे सांगून
विद्यार्थ्यांनो आयुष्यात तुम्ही एवढे मोठे व्हा कि, आई-वडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे. आई-वडिलांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांची ओळख झाली पाहिजे असे कार्य करा.
संस्थेचे चेअरमन मा. भाऊसाहेब रुपनर,मा.राजाभाऊ रुपनर,प्रा.डॉ.अमित रुपनर,मा.श्री.संजय अदाटे यांनी स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांना अल्प आयुष्य लाभले परंतु त्यांचे संपूर्ण कार्य हे विशाल, समाजउपयोगी व प्रेरणादायी असे होते. असेच कार्य करण्याची प्रेरणा आपण त्यांच्या कडून घेतली पाहिजे. अशा या महान असामान्य कर्तृत्वास विनम्र अभिवादन करून स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांच्या उत्तुंग कार्याविषयीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,फॅबटेक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिकंदर पाटील सर्व शाखांचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फार्मसीचे प्रा अमोल पोरे यांनी तर आभार प्रदर्शन पॉलिटेक्निकचे प्रा गणेश शिंदे यांनी केले.