सांगोला तालुका

भाई जगन्नाथराव (तात्या) लिगाडे यांनी जनतेच्या सेवेवरुपी केलेल्या कार्याची उंची आभाळाएवढी : मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील

राज्याच्या राजकारणामध्ये लिगाडे घराण्याचे नाव खूप मोठा आहे. राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी सरदार लिगाडे यांच्या वाड्यावरून ठरत होत्या. तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण करत असताना तात्यांनी निस्वार्थीपणे गोरगरिबांची सेवा केली गोरगरिबांसाठी त्यांनी खूप कष्ट केल आहे.  25 वर्षीय राजकारणाच्या इतिहासामध्ये प्रामाणिकपणे गोरगरिबांची सेवा करणारा कष्ट करणारा भाई जगन्नाथराव (तात्या) लिगाडे यांच्यासारखा चेअरमन आज पर्यंत बघितला नाही. म्हणून तात्यांनी जनतेच्या सेवेवरुपी केलेल्या कार्याची उंची आभाळाएवढी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.
भाई जगन्नाथराव (तात्या) लिगाडे यांच्या 17 व्या स्मृतिदिनानिमित्त स.शा. लिगाडेविद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स (कृषी) यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे- पाटील, पद्मश्री राहीबाई पोपरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्रीताई पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिताताई देशमुख, महिला सूतगिरणीच्या व्हा. चेअरमन श्रीमती कल्पनाताई शिंगाडे, भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या)चारी टेबल ट्रस्टचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा चे जनरल बॉडी सदस्य प्रा. नानासाहेब लिगाडे विद्यालयाचे प्राचार्य भाऊसो कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील बोलत होते.
पुढे बोलताना मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले तालुक्याचे राजकीय सामाजिक क्षेत्रात वाटचाल करत असताना तात्यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे होते.  राज्याच्या राजकारणामध्ये लिगाडे घराण्याचे नाव खूप मोठा आहे. राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी सरदार लिगाडे यांच्या वाड्यावरून ठरत होत्या. तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण करत असताना तात्यांनी निस्वार्थीपणे गोरगरिबांची सेवा केली. गोरगरिबांसाठी त्यांनी खूप कष्ट केले आहे. 25 वर्षीय राजकारणाच्या इतिहासामध्ये प्रामाणिकपणे गोरगरिबांची सेवा करणारा कष्ट करणारा तात्यांसारखा चेअरमन आज पर्यंत बघितला नाही. लिगाडे घराण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तालुक्यामध्ये काम चालू आहे. आणि ते इथून पुढे ही असेच चालू राहणार. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही शाळेमध्ये शिकत असताना तात्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे उज्वल भविष्य घडवले पाहिजे. त्याचबरोबर ट्रस्टचे व विद्यालयाचे नाव लौकिक केले पाहिजे असे मत यावेळी मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटीयांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे म्हणाल्या, मी लहानपणापासूनच शेती केली. घरातच वडील शाळा शिकवत होते पण ते शिक्षण नसून ज्ञान शिकवत होते. आयुष्यामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी लहानपणापासूनच मनात जिद्द आणि चिकटी विद्यार्थ्यांनी बाळगायला हवी बीजमाता व पद्मश्री होण्यासाठी आयुष्यामध्ये खूप खडतर प्रवास करावा लागला आहे. दुर्गम भागामध्ये बीज तयार करून त्यापासून रोपे तयार केली. बचत गटाच्या माध्यमातून 3000 महिलांना काम दिले. हे बीज तयार करण्यासाठी डोक्यावर पाणी आणून रोपे जगवली आहेत. आयुष्यामध्ये खूप संकटाचा सामना केला आहे. या कार्याची दखल भारत सरकारने देखील घेतली. आज पर्यंत आयुष्यामध्ये खूप पुरस्कार भेटले परंतु त्या पुरस्काराचा अभिमान वाटत नाही. कारण शेतकऱ्यांनी मातीला जपले पाहिजे, आरोग्याला जपले पाहिजे, पैसा असून चालत नाही आरोग्य जपले तर आपली पुढील पिढी आरोग्यदायी घडेल. प्रत्येक गावात बी बँक तयार झाली पाहिजे. सकाळच्या डब्याला विषमुक्त भाजी आली पाहिजे. त्यामुळे मरेपर्यंत मातीची सेवा करत राहणार मातीला कधीही सोडणार नाही माझ्यासारख्या राहीबाई प्रत्येक गावामध्ये तयार झाल्या पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयुष्य घडवायला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावावीत जिथे निसर्ग जास्त आहे, तिथे पाऊस जास्त पडतो जे दिसायला चांगलं असतं त्यात धमक नसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पिकांवर औषधाची फवारणी न करता विषमुक्त माती व शेती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील म्हणाल्या, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर टाळणे गरजेचे आहे. ज्या वयामध्ये शिक्षण घेऊन विद्यालयाचे, स्वतःचे आयुष्य घडवण्याचे वय आहे. त्या वयामध्ये आज मुले मुली सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. आयुष्यामध्ये कोणते तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी करिअर चांगलं घडवायचे असेल तर व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा या गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी लांब राहिलं पाहिजे, तरच विद्यार्थ्यांची प्रगती होईल. असे मत यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्रीताई पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई जगन्नाथराव लिगाडे चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्था साताऱ्याचे जनरल बॉडी सदस्य प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी केले.
यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य एम. डी. शिंदे, प्रा. आनंदराव खटकाळे तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी, सदस्य पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, महिलावर्ग, पालक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. संभाजीराव शिंदे यांनी मानले. तर सूत्रसंचालन डी. टी. घोरपडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!