सांगोला तालुका

फळविक्रेते ,स्टेशनरी विक्रेते, सूप व दुरडी केरसुनी विक्रेते व चप्पल दुरुस्ती वाले यांच्या डोईवर सांगोला इनरव्हील क्लब ची “छत्री

 

हातावर पोट असणारे अनेक महिला व पुरुष आपल्या प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी फळ विक्री, किरकोळ स्टेशनरी विक्री, सूप व दुरडी, केरसुणी विक्री व चप्पल दुरुस्ती करत असतात. उन्हातान्हात दिवस काढणाऱ्या या विक्रेत्यांच्या डोक्यावर आता इनरव्हिल क्लबचे ‘छत्र’ राहणार आहे. या सर्व विक्रेत्यांना सांगोला येथे मोफत छत्र्याचे वाटप करण्यात आले आहे.
सांगोला येथील वासूद चौकामध्ये वासुद – अकोलेचे श्री सतीश सुखदेव केदार हे बोर विक्रीचा व्यवसाय करतात. तसेच विटा बँकेसमोर शाबिरा जहांगीर मनेरी या महिला किरकोळ स्टेशनरी विक्रीचा व्यवसाय करतात, तसेच नगरपालिकेजवळ श्री शिवाजी नाथा डांगे हे चप्पल दुरुस्तीचे काम करतात. व भाजी मंडई आवारात सौ विद्या विनोद वडतीले या सूप, दुरडी व केरसुणी विक्रीचा व्यवसाय करतात. आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी ते उन्हातान्हात दिवसभर राबत असतात. याचा गांभीर्याने विचार करत सांगोला येथील इनरव्हील क्लबच्या महिला सदस्यांनी या सर्व विक्रेत्यांच्या डोईवर ऊन, पावसापासून संरक्षण करणारे ‘छत्र’ देण्याचा संकल्प केला. यानुसार श्री सतीश सुखदेव केदार, शाबिरा जहांगीर मनेरी, शिवाजी नाथा डांगे , व विद्या विनोद वडतीले यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी वासूद अकोला येथील रहिवाशी श्री आबा चौगुले यांचे सहकार्य लाभले.
सदर प्रोजेक्टसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उमा उंटवाले, तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष श्री. दत्ताञय पांचाळ सर व सचिव श्री. विकास देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच क्लब चे व्हाईस प्रेसिडेंट सविता लाटणे, ट्रेझरर वर्षा बलाक्षे, सीसी व पास्ट प्रेसिडेंट रत्नप्रभा माळी, क्लब मेंबर वनिता चव्हाण ,कविता दिवटे, स्वातीताई मगर उपस्थित होते. सदर प्रोजेक्टसाठी इनरव्हील क्लबचे कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!