सांगोला तालुका

शेतकरी महिला सहकारी वस्त्र निर्माण सूतगिरणी च्या पंचवार्षिक निवडणुकीत 19 जागेसाठी 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी वस्त्र निर्माण सूतगिरणी च्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी तेरा उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने आता 19 जागेसाठी 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत शेतकरी महिला विकास आघाडी पॅनलच्या कल्पना शिंगाडे व उषा देशमुख या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

 

सदर निवडणुकीत शेकाप पक्षातर्फे पॅनलला शेतकरी महिला विकास आघाडी असे नाव दिले आहे व त्यांचे चिन्ह कपबशी आहे तर विरोधी सागर लवटे यांच्या पॅनलला स्वाभिमानी सूतगिरणी बचाव असे नाव दिले असून त्यांचे चिन्ह शिट्टी आहे
कापूस उत्पादक मतदार संघात 11 जागेसाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामध्ये बचाव पॅनल तर्फे सातच उमेदवार उभे असून त्यामध्ये विमल बनसोडे, पार्वती अनुसे, विद्या बाजारे, कल्पना खरात, मंदा माने, सरोज पाटील, कौशल्या शिंदे हे उमेदवार आहेत
विकास आघाडीतर्फे 11 जागेसाठी 11 उमेदवार आहेत .त्यामध्ये वंदना बाबर, विमल बंडगर, शालन हजारे, शबाब खतीब, छाया कोळेकर, सुरेखा मदने, मालन पाटील, शोभा रसाळ, शुभांगी पाटील, उज्वला वाघमोडे, मायाक्का यमगर तर वेळेत अर्ज काढून घेता आले नसल्याने अपक्ष अश्विनी कोकरे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत

 

बिगर कापूस उत्पादक गटात पाच जागेसाठी 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामध्ये विकास आघाडी तर्फे पाच जागेसाठी पाच उमेदवार उभे असून त्यामध्ये द्रोपदी भगत, प्रतिभा ढोबळे, नम्रता जोशी, गोकुळाबाई मिसाळ, आनंदीबाई रुपनर,  या उभ्या आहेत तर बचाव पॅनल तर्फे पाच जागेसाठी 3 उमेदवार उभे आहेत त्यामध्ये छाया देशमुख, विमल दिघे, कांताबाई सातपुते हे उमेदवार उभे आहेत

 

अनुसूचित जाती व जमाती महिला गटात 2 जागेसाठी 3 उमेदवार उभे आहेत त्यामध्ये विकास आघाडी पॅनल तर्फे रतन बनसोडे , स्मिता बनसोडे हे उभे असून बचाव पॅनल तर्फे दोन जागेसाठी एक उमेदवार उभे असून ते छाया होवाळ या होत.
इतर मागासवर्ग गटात एका जागेसाठी 3 उमेदवार उभे आहेत त्यामध्ये विकास आघाडी तर्फे 1 जागेसाठी एकच राजश्री जाधव यांचा अर्ज आला आहे तर बचाव पॅनल तर्फे एका जागेसाठी 2 अर्ज आले असून त्यामध्ये जाकिरा तांबोळी व विद्या बाजारे असे दोन उमेदवार उभे आहेत. एक उमेदवार वेळेत अर्ज माघार घेण्यासाठी गेले नसता त्यामुळे तो अर्ज राहिला.
सदर निवडणुकीचे मतदान 7 जानेवारी 2024 रोजी सांगोला येथेच सकाळी 8 ते 5 या वेळेत होणार असून मतमोजणी 8 जानेवारी रोजी 8 वाजता होणार आहे. या संस्थेत मतदार कापूस उत्पादक गटात 1629 व बिगर कापूस उत्पादक गटात 721 असे 2350 मतदार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!