शैक्षणिकसांगोला तालुका

“न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये माता पालक मेळाव्याचे आयोजन”
बुधवार दिनांक 25 जानेवारी, 2023 दुपारी 3.00 वाजता न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक प्राथमिक ज्युनियर कॉलेज मध्ये माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मंगळवेढ्याच्या प्रा.सौ.शोभा काळुंगे मॅडम उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रमुख पाहुण्यांचे महिला पालकांना पाल्या संबंधित व महिला आरोग्य संबंधी योग्य मार्गदर्शन लाभणार आहे.
या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या शारीरिक , मानसिक तसेच बौद्धिक विकास अशा अनेक प्रश्नांसंदर्भात योग्य अशी चर्चा घेण्यात येणार आहे . महत्त्वाचे म्हणजे महिला पालक म्हणून आपली पाल्याबाबतची जबाबदारी नेमकेपणाने कशी पार पाडावी तसेच आजचे समाजाचे वातावरण पाहता आपल्या मुलांना नेमकेपणाने कसे वाढवावे ,वयानुसार त्यांचे वर्तन व आचरण कसे असायला पाहिजे अशा आणि अशा अनेक विषयाबाबत हे मार्गदर्शन असणार आहे.विद्यार्थी म्हणून आमची जबाबदारी पालक म्हणून तुमची जबाबदारी नेमकी काय आहे आपल्या मुलाचे आदर्श व्यक्तिमत्व घडवत असताना एक सक्षम आई म्हणून तुम्ही किती खंबीर असायला हवे यावरती हळुवार चर्चा होणार आहे .

आपल्या पाल्या संबंधी अशा अनेक विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन सर्व महिला पालकांना लाभणार आहे तरी या कार्यक्रमाचा सांगोला शहरातील सर्व महिलांनी व प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरातील महिला पालकांनी लाभ घ्यावा ही विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!