श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन मधील प्राध्यापिका सौ सुजाता पाटील यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने पीएचडी प्रदान

श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये 2006 पासून कार्यरत असलेल्या प्राध्यापिका सौ सुजाता पाटील मॅडम या बी एड महाविद्यालयात एक आदर्श प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत .’ विज्ञान विषयात संकल्पना चित्रांचा विकास व त्याची परिणामकारकता ‘ या विषयातील संशोधनासाठी त्यांना नुकतीच सोलापूर विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. भोजे पी. आर. दयानंद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका यांनी मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक यांचे सुद्धा सहकार्य लाभले.
त्यांच्या या पीएच.डी.च्या कामाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर एम.एन.नवले सर , सचिव संजय नवले सर, कॅम्पस डायरेक्टर अशोक नवले सर डायरेक्टर सौ बोकील मॅडम तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.पाटील सर , सर्व प्राध्यापक , मित्रपरिवार व नातेवाईक या सर्वांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.