वाघमारे सरांच्या कराटे यश; विराज केदार, विश्वजीत जाधव व शुभदा गव्हाणे चे यश

सांगोला (प्रतिनिधी):- दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी विद्यामंदिर इंग्लिश मिडियम सांगोला येथे शाओलियन वर्ल्ड मार्शल आर्ट शाखा सांगोला यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ब्लॅकबेल्ट प्रमाणपत्र परीक्षेमध्ये एकूण 17 मुलांनी यश संपादन केले. प्रमाणपत्र वितरणा कार्यक्रमास डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, स्वातीताई मगर, वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे माजी विद्यार्थी साहिल सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होते.
ब्लॅक बेल्ट फर्स्ट दान मध्ये शुभदा गव्हाणे, सानवी माने, बिदिशा कर, संस्कृती झिंजुटे, अमृता लवटे, पूर्वा पवार, उत्कर्षा पवार, अहमद खतीब, संस्कार झुंजुटे, सिद्धेय आदलिंगे, विश्वजीत जाधव, श्रेयश ढाकणे, गुरुराज पांढरे, सुजय सूर्यगंध, रुद्र करे, प्रताप करे यांनी फस्ट दान ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये यश संपादन केले तर विराज केदार यांनी ब्लॅक बेल्ट सेंड दान सीनियर ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये यश संपादन केले.
या परीक्षेमध्ये मुलांना सेल्फ डिफेन्स लाटी काठी नॉनचाकू, स्टमक फिटनेस, किक्स, ब्लॉक, पंच, कता, कुमिते, जुदो, अकिदो, किक बॉक्सींग आदी प्रकार घेण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे 26 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल कौतुक केले आणि वाघमारे सरांच्या कराटे क्लासला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या परीक्षा यशस्वी करण्याकरीता सांगोला येथील पहिले राष्ट्रीय पंच नीजेंद्र चौधरी, श्रावणी वाघमारे (पहिल्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या गोवा), सुनील मयंक स्वामी, आशिष कोकरे, सिद्धार्थ कांबळे, यशोलक्ष्मी मगर यांनी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब केदार, भाई राजू मगर, इंजि.रमेश जाधव, अनिता इंगवले मॅडम, दिनेश भोसले, संदीप चौगुले आदींनी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना श्री सुनील वाघमारे सरांचे मार्गदर्शन लाभले.