जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला ग्रामीण विभागात प्रथम

सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सरस्वती मंदिर,सोलापूर येथे दिनांक 18 डिसेंबर2022 रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून 24 गट सहभागी झाले होते .त्या स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील कुमार सार्थक नवनाथ तळे (इयत्ता नववी) व कुमारी सानिका तानाजी पाटील (इयत्ता दहावी )या विद्यार्थ्यांच्या गटाने सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण विभागातून प्रथम आल्याबद्दल सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांचे कडून देण्यात आलेले प्रमाणपत्र व ट्रॉफी गुणवंत विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष श्री प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .सदर विद्यार्थ्यांना प्रशालेतील गणित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव म. शं.घोंगडे सर, मुख्याध्यापक भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे ,उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभीशन माने ,पोपट केदार ,अजय बारबोले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.