विद्यामंदिर परिवारातील 5वी-8वी शिष्यवृत्तीधारक 90 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिर परिवारातील इयत्ता पाचवी व आठवी मधील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले त्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक, शाळा बाहय परीक्षा विभाग प्रमुख आणि संस्था बाहय परीक्षा विभाग प्रमुख व प्रशासकीय अधिकारी यांचा सत्कार समारंभ काल गुरुवार दि.5 जानेवारी रोजी मोठ्या उत्साही वातावरणात सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने संपन्न झाला.सदरचा सत्कार समारंभ मुख्याधिकारी सुधीर गवळी यांच्या शुभहस्ते व संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुध्दचंद्र झपके, संस्था सचिव म.शं.घोंगडे सर व संस्था खजिनदार शं.बा.सावंत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी सांगोला विद्यामंदिर 5 वीचे 35 विद्यार्थी,इयत्ता 8 वीचे 36 विद्यार्थी,कोळा विद्यामंदिर इयत्ता 5 वीचा 1, इयत्ता 8 वीचे 5 विद्यार्थी,नाझरा विद्यामंदिर इयत्ता 5 वीचे 2, इयत्ता 8 वीचे 9 विद्यार्थी,सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडियम सांगोला इयत्ता 5 वीचा 1 व इयत्ता 8 वीचा 1 विद्यार्थी असे एकूण 90 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.कार्यक्रमाच्या सुुरुवातीस संस्थापक कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सुधीर गवळी यांच्या हस्ते पुष्पहार समपर्र्णाने झाली.
अभ्यास केल्याशिवाय स्पर्धेत टिकता येणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे असे मत प्रमुख पाहुणे सुधीर गवळी यांनी व्यक्त केले.
समारंभप्रसंगी राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या 9 विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने प्रत्येकी रोख 1 हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आले. आणि जिल्हा गुणवत्ता यादीतील 81 विद्यार्थ्यांना ट्रॉफी व गुलाबपुष्प देण्यात आले.तसेच विषयवार पैकीच्या पैकी गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना विषय शिक्षकांकडून रोख रकमेच्या पारितोषिकांसह भेटवस्तू देण्यात आल्या.
सांगोला विद्यामंदिरमधील इयत्ता 8 वी मधील राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या 6 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रोख रुपये 250 चे पारितोषिक पर्यवेक्षक केदार सर यांच्याकडून देण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी दिगंबर शिंगाडे, सौ.म्हमाणे मॅडम व नवनाथ तळे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेचे नियोजन व मार्गदर्शक शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भीमाशंकर पैलवान यांनी तर आभार उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन वैभव कोठावळे सर यांनी केले.
याप्रसंगी नाझरा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड, कोळा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नारायण विसापूरे, प्रभारी मुख्याध्यापक रफिक मणेरी, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उदय बोत्रे यांच्यासह पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभीषण माने, मधुकर धायगुडे, सर्व शाखेतील शिक्षक, सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.