शेतकऱ्यांना खरिपासाठी वेळेवर , पुरेसे व दर्जेदार बियाणे व खते उपलब्धतेचे काटेकोरपणे नियोजन करावे- आम.अॕड.शहाजीबापू पाटील

दिनांक ०४ मे २०२३ रोजी तालुका स्तरिय खरिप हंगामपुर्व नियोजन बैठक मा. आमदार अँड. शहाजीबापू पाटील यांचे अध्यक्षतेखाली बचत भवन सभागृह पंचायत समिती सांगोला येथे पार पडली.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी येणाऱ्या खरिपामध्ये शेतकऱ्यांना वेळेवर , पुरेसे व दर्जेदार बियाणे व खते उपलब्धतेसाठी काटेकोरपणे नियोजन करण्याबाबत सुचना दिल्या. कृषि विमागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी शेतीतील अधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांचे बांधावर पोहोचविण्याचे व एक रूपयामध्ये पिक विमा या योजनेची जनजागृती करणेबाबत आवाहन केले. निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे बियाणे, खते व औषधी विक्री करावी असेही आवाहन केले.
पिक स्पर्धेमध्ये राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर विजेते ठरलेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन आमदार महोदय यांनी केले. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बोलताना पौष्टिक तृणधान्यावर भर देणेबाबत व रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीवर भर देणेसाठी जनजागृती करणेबाबत आवाहन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी निविष्ठांचे काटेकोरपणे गुण नियंत्रण करणेबाबत सुचना दिल्या. डाळिंब पिकावरील पिन होल बोरर किड नियंत्रणासाठी मोहिम राबविणे व कोल्ड स्टोरेज यासारख्या पायाभुत सुविधा उभारणीचे आवाहन केले. तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे यांनी खरिप नियोजनाबाबत तसेच मागिल वर्षी राबविलेल्या योजना व उपक्रम व पुढिल नियोजन याबाबत सादरीकरण केले. यावेळी पिक स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या शेतकरी बांधवांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. डाळिंब भौगोलिक मानांकन अधिकृत वापरकर्ता प्रमाणपत्र तसेच महाडिबीटी अनुदानित ट्रक्टर व औजरांचे वाटपही करण्यात आले. यावेळी पौष्टिक तृणधान्याचे प्रदर्शन ही लावण्यात आले होते. सदरिल बैठकिस तहसिलदार आभिजित पाटिल, प्रभाकर चांदणे, खंडू सातपुते ,अभिषेक कांबळे,दादासो लवटे,तुकाराम भुसनर, सत्यवान घाटोळे, कृषि अधिकारी पं.स. विकास काळुंखे , मंडळ कृषि अधिकारी , कृषि विभागाचा स्टाफ , निविष्ठा विक्रेते , पुरस्कार प्राप्त शेतकरी , पिक स्पर्धा विजेते शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.