मा.दिपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या चेअरमन पदी तानाजी साळे तर व्हा. चेअरमन पदी कुमार बनसोडे यांची बिनविरोध निवड

सांगोला (प्रतिनिधी) -अत्यंत अल्प व्याजदराने सांगोला तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना पतपुरवठा करणारी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था मा.दिपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी जवळे गावचे सुपुत्र व जि. प. शाळा राजुरीचे मुख्याध्यापक तानाजी साळे यांची तर व्हाईस चेअरमन पदी नाझरे गावचे सुपुत्र जि. प.शाळा ह.मंगेवाडी चे मुख्याध्यापक कुमार बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी आज सांगोला येथे कार्यालयात बैठक संपन्न झाली. याप्रसंगी सहकार निंबधक विभाग अधिकारी श्री. एस. एस.सांगोलकर साहेब यांनी दोघांचेच अर्ज आल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडी घोषित करण्यात आल्या.
याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक सर्वश्री संजय गायकवाड,वसंत बंडगर, विलास डोंगरे, गोविंद भोसले, माणिक मराठे, रफिक शेख, महादेव नागणे कमल खबाले, पल्लवी मेणकर-महाजन, सचिव अमर कुलकर्णी उपस्थित होते.याप्रसंगी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुहास कुलकर्णी, जिल्हा सोसायटीचे संचालक गुलाबराव पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सभेस जिल्हा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संजय काशीद पाटील,ज्येष्ठ नेते तानाजी खबाले,उमेश महाजन सह संघप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.