आम.बाबासाहेब देशमुख यांनी साधला ज्येष्ठांशी संवाद
सांगोला(प्रतिनिधी):-ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे धन असुन त्यानी उर्वरित आयुष्यात समाजाला मार्गदर्शन करावे व आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा असे मत सांगोला विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
26 जानेवारी रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशालेत झालेल्या मित्रसंमेलनात ते बोलत होते…या वेळी व्यासपीठावर प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्रा.विठ्ठलराव शिंदे,चंद्रशेखर अंकलगी,सौ.मिरा अंकलगी यांचेसह सांगोला विद्यामंदिर प्रशाला व न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मधून सेवानिवृत्त झालेले अनेक ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते..
सन 1975 साली 10+2+3 या त्यावेळच्या.नविन.आकृती बंधाची एस.एस.सी…10 वी पहिल्या बॅचचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते..त्या बॅचला या वर्षी एस.एस.सी उत्तीर्ण होवुन 50 वर्षे पूर्ण होत आहेत…त्या निमित्ताने सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सांगोला येथील ज्येष्ठ नागरिकांच्या मित्रसंमेलनाचे प्रमुख प्रा.राजेंद्र ठोंबरे व त्यांचे मित्र दिपक चोथे यानी हे विशेष मित्र संमेलन घडवून आणले..या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख याना निमंत्रित करण्यात आले होते.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, तुमचा जेवढा अनुभव आहे,तेवढे माझे वय नाही..त्यामुळे मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की कुटंबातील सदस्या करता जास्तीत जास्त वेळ देवून राहिलेल्या वेळेचा उपयोग समाजासाठी करावा…सांगोला तालुक्यातील महिलामध्ये स्तनाचा कॅन्सर व गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे,त्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असुन त्यात ज्येष्ठ नागरिकानी योगदान द्यावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय पदावरुन बोलताना प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांनी त्यानी शिकवलेलया या पहिल्या बॅचचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या…या बैचचे वैशिष्ट म्हणजे या बैचचे विद्यार्थी सातवीपर्यंत जि प प्राथमिक मुलांची व मुलींच्या शाळेतून 1972 साली इयत्ता सातवी उत्तीर्ण झाले होते..त्यानंतर काही विद्यार्थी सांगोला विद्यामंदिर, काही न्यू इंग्लिश स्कूल व काही अन्यत्र पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेले..1975 साली दहावी …एस.एस.सी.उत्तीर्ण झाल्यानंतर परत काही विद्यामंदिर प्रशालेत 11वी साठी शिक्षणासाठी आले…त्यामुळे हे मित्रसमेलन कोणत्याही शाळेच्या नावे न घेता एस एस सी 1975 – दहावी बॅचचे नावे घेत असल्याची माहिती प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी प्रास्ताविकात दिली..
कार्यक्रमाची सुरुवात कै.गुरुवर्य बापुसाहेब झपके यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली..माजी विद्यार्थी दिपक चोथे व चंद्रकांत पतंगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले..शाल,श्रीफळ,सांगोला येथील अंबिका मंदिरातील देवीची प्रतिमा देवून मान्यवरांचा व सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला..
गुरुजना पैकी विठ्ठलराव शिंदे, एम.डी.बनकर, डी.डी जगताप, अंकलगी मैडम यानी मनोगत व्यक्त करताना 50 वर्षानंतर शाळेत येवुन झेंडावंदनाला उपस्थिती लावली व मित्रसमेलन आयोजित केल्याब्द्द्ल कौतुक करुन शुभेच्छा दिल्या..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गमित्र अरूण पाटील,अशोक पाटील, मोहन माळी,किरण पतकी ,रामचंद्र इंगोले, तानाजी घाडगे, अमर गुळमिरे, संदीपान सावंत, नारायण चव्हाण, नंदकुमार ठोंबरे यांच्यासह अनेक वर्गमित्रानी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी मुंबई, कल्याण, पुणे, सोलापुर, पंढरपुर, सांगली, कोल्हापुर,खेड अशा अनेक ठिकाणाहून वर्गातील मित्र व मैत्रिणी आल्या होत्या…कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात वर्गमित्रानी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केला..यात गाणी, भावगीत, लावणी, सिनेगीत, कविता वाचन, विनोद कथन, जीवनातिल अनुभव कथन यांच्या मुळे वातावरणात समिश्र भावना दाटून आल्या. दर दोन वर्षानी मित्रसमेलन घेणार्या या बॅचचे पुढील मित्रसमेलन 2027 साली होणार असल्याची माहिती समेलन प्रमुख प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी दिली.आभार दिपक चोथे व अरूण पाटील यांनी मानले.सर्व वर्गमित्र व मैत्रिणीना अंबिकादेवीची प्रतिमा भेट म्हणून देवून निरोप देण्यात आला..
विशेष म्हणजे या बॅचचे विद्यार्थी सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.भरत शेळके व त्यांच्या अकादमी मधील विद्यार्थ्यानी येवुन सर्व गुरुजनाना मानवंदना दिली…मनोगत व्यक्त करताना शेळके यानी सेवाकाळातील आठवणी सांगुन कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.