महाराष्ट्र

दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध

दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक सन 2022-23 ते 2027-28 ही बिनविरोध पार पडली आहे. सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर ही यंदा 111 व्या वर्षात कार्यरत आहे. पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगधंद्याच्या जडण घडणीमध्ये या बँकेचा हातभार आहे.

बँकेचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी बँकेच्या कारभारास शिस्त लावून बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रभर विस्तृत करीत शाखाविस्तार केला होता. सध्या बँकेच्या प्रधान कार्यालयासह 30 शाखा कार्यरत आहेत. बँक अर्थकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपत आली आहे. बँकेचे सभासद, तसेच ठेवीदार, हितचिंतक यांना शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या आपल्या पंढरपूर अर्बन बँकेची निवडणुक बिनविरोध व्हावी अशी सर्वांचीच अपेक्षा होती. त्यामुळेच दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठीची निवडणुकीचे सर्वाधिकार चेअरमन श्री.प्रशांत परिचारक यांना देणेत आले होते.

      आज दि.12 जानेवारी 2023 रोजी नामनिर्देशन अर्ज परत घेणेची अंतिम तारीख होती. सदर संचालक मंडळाचे निवडीसाठी मंजूर झालेले 18 जागांपैंकी श्री.प्रशांत उर्फ शैलेंद्र प्रभाकर परिचारक यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज परत घेणेत आला. संचालक मंडळाचे निवडीसाठी आवश्‍यक असणारे 17 जागांसाठी 17 उमेदवारांचे अर्ज राहिलेने सदर निवडणुक बिनविरोध म्हणून सहाय्यक निबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी श्री.पी.सी.दुरगुडे यांनी जाहीर केले. लवकरच चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया पुर्ण करणेत येणार आहे.

      सदर निवडणुक बिनविरोध झालेमुळे बँकेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकामधून आनंद व्यक्त केला जात आहे.

नवनिर्वाचित संचालकांची नावे अशी :

श्री.परिचारक राजाराम पांडुरंग, श्री.कवठेकर रजनीश दत्तात्रय, श्री.ताठे हरिष माधव, श्री.मुळे सतीश दादासाहेब, श्री.घंटी पांडुरंग पुंडलिक, श्री.कुलकर्णी शांताराम पांडुरंग, श्री.हरिदास विनायक विठ्ठल उर्फ मदन, श्री.मांगले अमित प्रफुल्ल, श्री.कटप अनंत नंदकुमार, श्री.शिंगण गणेश नागेश, श्री.उत्पात ऋषिकेश वासुदेव, श्री.कौलवार व्यंकटेश सुरेश, महिला राखीव मधून सौ.जोशी माधुरी अभय, सौ.पाटील संगीता शितल, अनु.जाती/जमातीमधून श्री.सुरवसे मनोज तुकाराम, भज/विज/विमाप्रवर्गातून श्री.अभंगराव अनिल शशीकांत, इतर मागासवर्गीय मधून श्री.माने गजेंद्र बाबुराव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!