सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

शाम पवार यांचा ‘समजभूषण’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान 

सांगोला: डोंगरगाव येथील शाम पवार यांना “लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था संभाजीनगर” संस्थेच्या मार्फत दरवर्षी दिला जाणारा  ‘समाजभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.डोंगरगाव ,सांगोला तालुकासाठी नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाची बाब असून ,त्यांच्या सार्वजनिक जीवनात  आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव आहे.
कॉलेज जीवनात हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखले गेले , नाटक, गीते,एकांकिका यामध्ये सतत सहभाग होऊन सांस्कृतिक वारसा जपला व महात्मा फुले समाजसेवी संस्था करमाळा या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरवात झाली.रेखाताई केदार व लालासो पाटील यांच्या साथीने अंधश्रद्धा निर्मूलन, महिला समस्या, दुर्लक्षित घटक यांच्यासाठी मोठे कार्य केले.ही त्याची सामाजिक व सांस्कृतिक कार्याची सुरवात झाली.यानंतर उत्कर्ष शिक्षण व समाजसेवी संस्था स्थापन करून संस्थेच्या माध्यमातून आपलं समाजकार्य चालू ठेवले.यामध्ये अपंग लोकांना मोफत कृत्रिम हात-पाय,खुर्ची, आधार काठी इ.साहीत्य पुरवठा केला,स्वच्छता अभियान, महिला मेळावे, आरोग्य शिबीर, रोजगार हमी, रोजगार जागृती शाखा,गावांमध्ये महिलांचे संघटन करून दारूबंदी ,स्वच्छ व व्यसनमुक्त गाव चळवळ उभी केली,सफाई कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले, चार हृदरोग्यांना मदतीचा हात देवून त्यांना नवीन जीवदान दिले,गावामध्ये युवकांचे संघटन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली त्यामुळे शिवजयंती पासून वेगवेगळे सण उत्सव साजरे केले गेले.
क्रीडा क्षेत्रात क्रिकेट पासून ते वेगवेगळ्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिले. त्याच बरोबर गावाच्या विकासासाठी व प्रगतीसाठी वेळोवेळी संघर्ष व आंदोलने केली. यामध्ये डोंगरगाव रेल्वे स्टेशन ,रेल्वेचा थांबा होणेसाठी इतकेच नाही रेल्वे स्टेशन चे नामकरण ‘म्हसोबा डोंगरगाव’ होण्यामध्ये शाम पवार यांची महत्वाची भूमिका आहेत्यांनी रुळलेल्या वाटेवरून न चालता नवीन मार्ग निर्माण केले.
  त्यांच्या या कार्याची दखल घेऊन  लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था संभाजीनगर महाराष्ट्र राज्याच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त  त्यांना  समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!