सांगोला तालुका

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जवळे येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न.; जवळे गावात सर्वत्र राममय वातावरण

जवळे (प्रशांत चव्हाण) मंगल भवन अमंगल हारी|उमा सहित जेही जपत मुरारी||अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जवळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जवळे गावात उत्साही व धार्मिक वातावरण तयार झाले होते. सोमवारी अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला.

 

या आनंदाच्या क्षणी जवळे गावात भगव्या पताका घरावर झेंडे लावून तसेच काही ठिकाणी गुढ्या उभा करून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या व दीपोत्सव साकारण्यात आला. जवळे येथील ग्रामदैवत श्री.नारायण देव मंदिरामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून श्री.नारायणदेव महिला व पुरुष भजनी मंडळ यांनी प्रभू श्रीरामावर आधारित भजने सादर केली. त्यानंतर ठीक 12 वाजून 20 मिनिटांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी झाल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर जवळे गावातील महिला व पुरुष भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी सौ.रूपमतीदेवी साळुंखे-पाटील,श्री श्रीकांत दादा देशमुख,श्री साहेबराव दादा पाटील यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली सायंकाळी6 वाजून 30 मिनिटांनी श्री.नारायणदेव मंदिर येथे दीपोत्सव साजरा केल्यानंतर फुलांनी सजवलेल्या प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची जवळे गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी जय श्रीराम जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राम भक्तांनी परिश्रम घेतले.

 

तसेच वीरशैव लिंगायत समाज जवळा यांच्या वतीने सायं प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी वीरशैव लिंगायत समाजातील पाच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच लहान मुलांनी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची वेशभूषा साकारली होती. तसेच महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून 1008 दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. वरील सर्व कार्यक्रमासाठी समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!