सांगोला येथील श्रीराम प्रतिष्ठान व आजोबा गणपती सांगोला यांच्या वतीने रामभक्तांचा सत्कार संपन्न

सांगोला -अयोध्येतील प्रभू राम लल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठानेच्या ऐतिहासिक सोहळा निमित्ताचे औचित्य साधून सांगोला येथील श्रीराम प्रतिष्ठान व आजोबा गणपती सांगोला यांच्या वतीने सांगोला शहरातील रामभक्त तुकाराम कुलकर्णी, अनिरुद्ध पुजारी, प्रतिभा पुजारी ,वसंत पुजारी , अँड.नागेश खर्डीकर , अशोक व्हटे सर ,उदय पुजारी, वैभव बेले, वसंत सुपेकर, डॉ. अनिल कांबळे, हरिभाऊ कुलकर्णी, बिंदू माधव पत्की, देविदास घोंगडे, अनंत कुलकर्णी, डॉ. गणपतराव मिसाळ, किरण पत्की दीपक पत्की, गोपाळ देशपांडे आदीचा प्रभू श्रीरामाची मूर्ती, गुलाब पुष्प श्रीफळ देऊन सत्कार केला.
हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आजोबा गणपती मंडळ, नवनाथ इंगोले यांनी 10 बाय 20 चे इलेक्ट्रॉनिक स्क्रीन विनामूल्य उपलब्ध करून दिल्यामुळे राम भक्तांना प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठनेचा सोहळा ’याची देही याची डोळा ’ पाहण्याचा लाभ मिळाला. या सत्कार सोहळ्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, अँड सारंग वांगीकर, शिवसेनेचे समीर पाटील, इंजि. संतोष भोसले, अमोल लऊळकर, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, मानस कमलापुरकर,मयुरेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामभक्त अँड नागेश खर्डीकर यांनी, सन 1992 सालच्या आठवणी सांगताना सांगोल्यातून आम्ही 35 रामभक्त आयोजित नियोजित वेळेत पोहचलो. त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंगल, विनय कटियार, कुमार भारती आदींची भाषणे आम्हाला सर्वांना स्फूर्ती देणारी होती त्यामुळे रामभक्तांचा उत्साह अतिशय शिगेला पोचला होता. आज आपण या सुवर्ण ऐतिहासिक क्षणाचे भागीदार झालो आहोत. आजचा राम लल्ला प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा रामराज्याकडे नेणारा असून राम मंदिर उभारण्याचे श्रेय प्रखर हिंदुत्ववादी राम भक्तांना जात असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. यावेळी उपस्थित राम भक्तांनी सियापती प्रभू रामचंद्र की जय बोला जय श्रीराम च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.