महाराष्ट्र
फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रोजेक्ट

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि. कॉलेजमध्ये विज्ञान व कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान दिंडीने करण्यात आली.
दिंडीमध्ये सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून ही दिंडी फॅबटेक कॅम्पस मध्ये निघाली. या दिंडीत विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांचे फलक व विज्ञान बोध वाक्य हाती घेतली होती. विज्ञान व कला प्रदर्शन यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, श्री प्रमोद देठे, श्री गणेश कबीर, संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, डॉ. सुरज रुपनर,सौ. सुरेखा रुपनर, प्राचार्य सिकंदर पाटील,ए.ओ वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ वनिता बाबर हे लाभले. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
विज्ञान दिनानिमित्त प्रशालेतील विद्यार्थी अनुक्रमे श्रेया शिंदे, सानवी कटप, मयुरेश राऊत, ओंकार खरात या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व व शास्त्रज्ञांच्या बद्दल माहिती सांगितली. तर प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री निसार इनामदार यांनी सी.व्ही. रमण यांच्या जीवन कार्याविषयी व रमण इफेक्ट बद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी खगोलीय घटना व विज्ञान तसेच सूर्यमाला यांच्या विषयी माहिती दिली .तर श्री प्रमोद देठे यांनी विज्ञान व कला या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन सांगितले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोगांचे निरीक्षण केले, तर आर्ट गॅलरी मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध चित्र मॉडेल रंगकाम टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तसेच रांगोळी यांचे हे निरीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी श्री प्रमोद देठे यांनी अक्षर लेखनाचे व स्केच याचे विविध नमुने विद्यार्थ्यांना काढून दाखवले.
या विज्ञान व कला प्रदर्शनासाठी लहान गटासाठी सौ भारती जुंधळे व सौ प्रियंका मोहिते, मध्यम गटासाठी श्री अभिनंदन टाकळे व श्री प्रवीण उबाळे, मोठ्या गटासाठी श्री संजय देशमुख यांनी काम परिक्षक म्हणून काम पाहिले. हे विज्ञान व कला प्रदर्शन पार पाडण्यासाठी विज्ञान शिक्षक श्री निसार इनामदार व कला शिक्षक श्री अविनाश जावीर यांचे सरांचे सहकार्य मिळाले. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका मोहिते यांनी केले. तर आभार श्री अभिनंदन टाकळे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.