सांगोला तालुका

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार : नगरसेवक आनंदाभाऊ माने

आनंदाभाऊ माने गटातील कार्यकर्त्याच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्याचा घेतला निर्णय

सांगोला तालुक्याचे आमदार ॲड. शहाजी बापू पाटील यांनी तालुक्यातील विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला .या निधीतून सांगोला शहर व तालुक्यातील विकास कामे मार्गी लावली .आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2016 साली नगरपालिका निवडणुक पार पडली. महायुतीमधील घटक पक्षातील सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी महायुतीतील मा, लोकनियुक्त नगराध्यक्षा, मा. नगरसेवक ,नगरसेविका  ,कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सोबत घेऊन खासदार रणजीत निंबाळकर यांचा एक दिलाने प्रचार करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास आनंदभाऊ माने यांनी शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान व्यक्त केला.
राजमाता प्रतिष्ठान कार्यालय सांगोला येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी महायुतीतील माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई आनंदा माने ,नगरसेवक तथा गटनेते आनंदा गोरख माने ,माजी नगरसेवक अस्मिर गुलाब तांबोळी ,माजी नगरसेविका छायाताई सूर्यकांत मेटकरी, माजी नगरसेवक माऊली बाळकृष्ण तेली, माजी नगरसेवक सोमनाथ मारुती गुळमिरे, माजी नगरसेविका अप्सराताई सोमनाथ ठोकळे ,माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे .
या बैठकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दगडू गावडे ,चेअरमन तायप्पा माने, तसेच महाराष्ट्र राज्य बहुजन भारत सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे, धनगर समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर, मेजर आनंद व्हटे, बाबू माने ,धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप जानकर ,ज्ञानेश्वर गाडेकर, सूर्यकांत मेटकरी, बिटुभाई मुलाणी,  महेश कदम, राजेश खडतरे ,रामभाऊ गाडेकर ,काशिलिंग गाडेकर , सुशांत साळुंखे, समाधान सावंत, देविदास गावडे, प्रशांत माने ,बाळासाहेब सरगर ,प्रभाकर सरगर ,गुंडादादा मेटकरी ,सागर चांडोले ,वैभव चांडोले ,उमेश चांडोले, सिद्धेश्वर शेंबडे, योगेश साळुंखे ,संजय, माने , दत्ता तेली, आशिक मुजावर ,आथिक मुजावर ,  संतोष गाडेकर, अमित धतिंगे. सागर माने, राजू कोळेकर ,आदिनाथ नरुटे, उमेश पवार ,विशाल घुटुकडे, प्रसाद जिरगे ,प्रसाद खांडेकर, राजू कोकरे, विशाल जानकर ,विनोद ढोबळे, धीरज काटे ,योगेश लवटे, शिवाजी गावडे, समाधान नरुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पुढे बोलताना आनंदा माने म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत  सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचा प्रचार करणार असून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून  देऊ. आगामी विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका  निवडणुकीत महायुतीत एकत्र येऊन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली , भविष्यातील निवडणुकीत व विकास कामकाजाच्या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे .तसेच मुख्यमंत्री  एकनाथ  शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी महायुतीतील नगरसेवक, नगरसेविका, यांना सोबत घेतले जाणार आहे .शहराच्या विकासासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सत्तेच्या बरोबर राहिल्यास निश्चितपणे त्याचा विकासासाठी फायदा होतो. आमदार शहाजी बापू पाटील देतील ती जबाबदारी पूर्ण करू असा विश्वास आनंदाभाऊ माने यांनी या बैठकीत व्यक्त केला .नगरपालिका कार्यकाळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याने विकास कामे पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या.  लोकसभा निवडणुकीत खासदार, रणजीतसिंह निंबळकरांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करु, असा विश्वास व्यक्त केला .बापूंच्या माध्यमातून शहरातील भुयारी गटारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे .वाडीवस्तीवरील विकास कामे  मार्गी लागतील. नगरपालिकेच्या गत निवडणुकीत मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने माने यांच्या 15 टक्के खर्चाच्या निधीतून विविध विकास कामे मार्गी लावली. भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी   महायुतीत सामील होऊन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुका व ध्येय धोरणे निश्चित करण्यात येतील .असे आनंदाभाऊ माने यांनी सांगितले .
यावेळी मायाका प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काशिलिंग गावडे यांनी प्रास्ताविक केले व उपस्थितांचे आभार ही व्यक्त केले. तसेच यावेळी माजी नगरसेवक समीर तांबोळी व बहुजन भारत सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट: माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदाभाऊ माने यांनी सर्व कार्यकर्ते व मित्रपरिवार यांची  निवडणुकीच्या संदर्भात व पुढील निर्णय घेण्याच्या संदर्भात बैठक आयोजित केली .या बैठकीत सर्व  पदाधिकाऱ्यांनी ,कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने जो निर्णय घेतील तो , मान्य असून त्याप्रमाणे पुढील वाटचाल केली जाईल. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन महायुतीतील माजी नगरसेवकांना सोबत घेऊन शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत प्रवेश केला जाईल व आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला जाईल.  लोकसभा निवडणुकीत खासदार, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला . या निवडणुकीत खासदार निंबाळकर यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याविषयी  एकमताने निर्णय घेण्यात आला .आनंदाभाऊ माने, यांनी सर्वांना विश्वास घेऊन घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली  यांच्या सोबत राहून निवडणुकीत काम करू. भविष्यात बापूंच्या निर्णयानुसार पुढील वाटचाल केली जाईल
काशिलिंग गावडे ,धनगर समाजसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष, मायाका प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!