अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत महत्वाची बातमी; ‘तो’ ठराव मंजूर, आता उद्यापासून…

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासुन अंबादास दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत.