महाराष्ट्र

सांगोला शहरातील चौकाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणार :-डॉ.बाबासाहेब देशमुख.

सांगोला तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती चे साठे नगर येथील तरुणांनी आयोजन केले होते यावेळी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून उपस्थित नागरिकांना संबोधित करताना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी तमाम बांधवांना शुभेच्छा देऊन सांगोला शहरातील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा असलेल्या चौकाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणार असल्याची घोषणा केली व त्यांच्या या निर्णयाचे समाजबांधवातून कौतुक होत आहे.
ज्या अण्णाभाऊ साठे यांनी व्यवस्थेला आपल्या साहित्यातून चपराक मारून मराठी भाषेसह त्यांचे साहित्य साता समुद्रा पार पोहोचवले त्या अण्णाभाऊ साठे यांना सांगोला येथील काही कथाकथित बुरसटलेल्या विचारांच्या लोकांनी मर्यादित करून ठेवले होते त्यांच्या या स्वार्थी प्रवृत्तीला फाटा देत नवीन उमेदीच्या तरुणांनी अण्णाभाऊ यांचे विचार जगासमोर यावेत यासाठी जयंती साजरी केल्याचे तसेच अण्णाभाऊ हे कोणाची खाजगी मालकी नसल्याचे मत काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी व्यक्त केले.  अण्णाभाऊंचे विचार आणि त्यांचे साहित्य हे जगाला दिशा देणारे असून त्यांना कोणी मर्यादित करू नये या भावनेने काल दि.११ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे नगर सांगोला येथे जयंतीनिमित्त भरघोस कार्यक्रमांचे आयोजन केले होते .
याप्रसंगी व्यासपीठावरून सांगोला नगरपालिका उपगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महिला मैना बनसोडे, नगरसेविका अप्सरा ठोकळे, सरपंच रवींद्र मेटकरी या मान्यवरांनी आपल्या शब्दसुमनांनी अण्णाभाऊंना अभिवादन केले आणि आगामी काळात अण्णाभाऊंची विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी या तरुण वर्गाला प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले..
यावेळी व्यासपीठावर सूतगिरणी संचालक अभिजित कांबळे,आडवोकेट निरंजन गडहिरे,रामा बनसोडे, अमित रणदिवे, प्रेम लोखंडे,शरद रणदिवे,लहुजी पॅन्थर सेनेचे महेश वाघमारे, दादा वाघमारे, राजू लोखंडे, भोला रणदिवे, शंकर साठे, रोहित कारले,अविनाश कांबळे, सुरज फाळके, संतोष पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button