हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हलदहिवडी ता.सांगोला येथे स्वर्गीय डॉक्टर आमदार गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

दिनांक 11 /8/ 2025 रोजी हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे पुरोगामी युवक संघटना हलदहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सांगोला तालुक्याचे आमदार आदरणीय श्री डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे होते
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी यामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री विश्वनाथ (नाना )चव्हाण आदरणीय संचालक श्री विलास (बापू )येडगे तसेच पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते यामध्ये सांगोला तालुका आरपीआय अध्यक्ष श्री खंडू सातपुते तसेच श्री राहुल सातपुते श्री तानाजी हांडे श्री शहाजी चव्हाण श्री किसन फाळके श्री राजू गायकवाड श्री दत्तात्रय व्हटे श्री रामलिंग पवार श्री उमराव फाळके श्री ज्योतीराम लेंडवे हे ही उपस्थित होते या सर्वांच्या सहकार्याने प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदहिवडी याही विद्यार्थ्यांना या शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रमांमध्ये सहभागी करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री रमेश येडगे (वकील )साहेब यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली नंतर प्रशालेच प्राचार्यश्री रामचंद्र जानकर सर तसेच विश्वनाथ ( नाना ) चव्हाण विलास (बापू )येडगे यांच्या हस्ते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले व हलदहिवडी विद्यालय व हलदहिवडी ग्रामस्थ यांना कुठल्याही अडचणीच्या काळात आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू मदत करूअसे आश्वासन दिले. त्यानंतर पुरोगामी युवक संघटनेचे सर्व कार्यकर्ते यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थिनींनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून राख्या बांधल्या तसेच पर्यावरणाचे ही संतुलन राखावे आणि ते आपले कर्तव्य आहे असा संदेश देणारे प्रशालेतील इको क्लब अंतर्गत श्री काझी सर यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते व उपस्थित सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत वृक्षालाही राखी बांधण्यात आली.
त्यानंतर लक्ष्मीदेवी बचत गट चे प्रमुख तानाजी हांडे यांच्या वतीने प्रशालेतील एन. एम. एम. एस. विभागाचे प्रमुख श्री प्रकाश गळवे सर यांना राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी हलदहिवडी ग्रामस्थ यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सहशिक्षक श्री मोरे सर यांनी केले



