आदर्श गुरुकुल विद्यालयातील विद्यार्थ्यांचे विभागीय “सॉफ्ट बॉल” स्पर्धेमध्ये घवघवीत यश ;डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार

सांगोला:- आदर्श गुरुकुल विद्यालय पेठ वडगाव कोल्हापूर येथे शिकत असणारे विद्यार्थी यांनी “सॉफ्ट बॉल” स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर विभागीय स्पर्धेमध्ये सांगोला येथील वाकी घेरडी गावचे संस्कार रावसाहेब उत्तरे एकोणीस वर्षे वय गट याची, तसेच रितेश रेवनसिद्ध पाटील वाणीचिंचाळे ,यशराज संतोष पाटील राजापूर ,संग्राम गणेश पाटील लक्ष्मी दहिवडी यांचे चौदा वर्ष वयोगटांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .राज्यस्तरीय स्पर्धा 22 जानेवारी २०२३ रोजी नागपूर येथे होणार आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुलांचे फेटा बांधून सत्कार केले तसेच त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सांगोल्याचे नाव उज्वल होवो अशी सदिच्छा व्यक्त केली. सदर सत्कार कार्यक्रमासाठी माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब साळुंखे सहसचिव उत्तम चौगुले ,खजिनदार आनंदा व्हटे, शिवाजी काका लवटे, रामहरी नलवडे ,रामचंद्र काशीद, माणिक बाबर ,अविनाश पवार ,भाऊ निमग्रे , रावसाहेब उत्तरे ,रेवण पाटील सर्व पदाधिकारी आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांचे माता पिता, वाणी चिंचाळे गावचे सरपंच जितेंद्र गडहिरे, माजी सरपंच समाधान झाडबुके ,गोपाळ पाटील, बाळू पाटील, रतिलाल पाटील, विठ्ठल घुगे, सुखदेव गायकवाड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.