सांगोला विद्यामंदिरचा बॉक्सिंग स्पर्धेत विभागीय स्तरावर दबदबा कायम; महेक मुलाणी व पवन गायकवाड विभाग स्तरावर प्रथम

सांगोला ( प्रतिनिधी) विभागीय स्तर बॉक्सिंग स्पर्धा सन २०२२-२३ अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या दोन खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला.
यामध्ये सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील इयत्ता दहावी मधील कुमारी महेक इरफान मुलाणी(१७ वर्षे वयोगट मुली – ६६ ते ७०किलो वजनी गट) या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळविला व दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावी शास्त्र ब मधील कुमार पवन भाऊसो गायकवाड (१९ वर्षे वयोगट मुले – ७५ ते ८१ किलो वजनी गट) या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच या दोन्हीही खेळाडूची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली.
या धवल यशाबद्दल यशस्वी खेळाडूंचा पालक इरफान मुलाणी व भाऊसो गायकवाड यांचेसमवेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते व संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे,उपप्राचार्य प्रा. गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले , पोपट केदार, बिभीषण माने यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..
या यशस्वी खेळाडूंना सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रा.सचिन चव्हाण यांचे बॉक्सिंग खेळासंदर्भातील महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.तसेच ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डी. के. पाटील, क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव, संतोष लवटे,सुभाष निंबाळकर याचे मार्गदर्शन मिळाले.
तसेच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव म.शं.घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..