सांगोला तालुकाशैक्षणिक

मोहोळ येथे उद्या विज्ञान मंडळाचे वार्षिक जिल्हा  अधिवेशन; आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार रफिक मणेरी यांना जाहीर

सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे दहावे जिल्हा वार्षिक अधिवेशन मोहोळ येथे उदया रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी होणार आहे
सदर अधिवेशन दत्त प्रशाला मोहोळ ( रेल्वे स्टेशन जवळ ) येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत होणार आहे आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार समारंभ होणार आहे अधिवेशनात प्रयोगातून विज्ञान या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने आयोजित केली आहेत विज्ञान विषय विद्यार्थ्यांना सोपा करून शिकविणे विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी हे उद्देश साध्य करण्यासाठी शिक्षकांनी नविन पध्दतीने अध्यापन करावे याबाबत मार्गदर्शन होणार आहे
तसेच विज्ञान मंडळाचे नूतन तालुका कार्यकारणी सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे
सांगोला तालुका मधून रफिक मणेरी सर ( प्र प्राचार्य कोळा विद्यामंदीर ) यांना जाहीर झाला आहे
रफिक मणेरी हे सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे सन 2008 मध्ये तालुका अध्यक्ष होते त्यांनी विज्ञान मंडळाचे उभारणीसाठी योगदान दिले आहे विज्ञान शिक्षकांना त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे विविध स्पर्धा परीक्षा , विज्ञान प्रदर्शन , विज्ञान प्राविण्य परीक्षा विज्ञान प्रज्ञा परीक्षा यामध्ये अनेक विद्यार्थी यांनी प्राविण्य मिळविले आहे
सांगोला विज्ञान मंडळाची बैठक संपन्न झाली सदर बैठकीस तालुकाध्यक्ष अध्यक्ष उत्तम बेहेरे, तालुका सचिव अतुल लुंगारे, निलकंठ लिंगे,  सुनिल लिगाडे, सोमनाथ सपाटे, यतिराज सुरवसे, बिराप्पा गरंडे, प्रदिप बाबर, अमोल रणदिवे, देवदत्त केदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!