भयभुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त सांगोला करण्यासाठी जनताच परिवर्तन करणार- डॉ.बाबासाहेब देशमुख

सांगोला :- सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकासआघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या निवडणूकीच्या प्रचारास बुधवार (दि.6) रोजी सुरुवात झाली. सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील गणेश मंदिरात नारळ फोडून श्री.शंभु महादेवाचे दर्शन घेऊन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी बुधवार दि. 6 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.
याप्रसंगी बोलताना डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, मागच्या 5 वर्षामध्ये सांगोला तालुक्यात मलिंदा गँग तयार झाली होती. त्या मलिंदा गॅगने तालुक्यामध्ये कामे फक्त दाखवायला ठेवली होती. गेल्या 5 वर्षात सर्वसामान्य जनतेची प्रशासकीय कार्यालयात कामे झाली नाहीत कारण प्रत्येक ठिकाणी पाकिटे मागितली गेली. हे कधीही मागच्या 55 वर्षात घडले नव्हते.त्यामुळे आबासाहेबांनी सांगोला तालुक्याचे एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेले नाव हे दुषीत झाले आहे. परत एकदा भयभुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त सांगोला तालुका करण्यासाठी जनताच परिवर्तन करेल असे सांगत सर्वांनी परिश्रम घेऊन परिवर्तन करण्यासाठी सज्ज होऊया अशी अपेक्षा व्यक्त करत शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
बुधवार(दि.6) रोजी डॉ.भाई बाबासाहेब देशमुख व डॉ.भाई अनिकेत देशमुख यांनी दर्शन घेत आपला निवडणूक प्रचार सुरू केला.यावेळी मंदिर परिसरापासून मुख्य चौकापर्यंत वाजत गाजत भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये महाविकास आघाडीचे व मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्या ज्या भागातून ही रॅली जात होती त्या त्या ठिकाणी स्थानिकांचा डॉ.भाई.बाबासाहेब देशमुख यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले असून जोरदारपणे प्रचार सुरू आहे. महागाई वाढली असून सर्वसामान्यांना या महागाईला सामोरे जावे लागत आहे. यासह अनेक प्रश्न आव्हानात्मक बनले आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने जनता उभी राहील.शेकापचे उमेदवार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख व डॉ.भाई अनिकेत देशमुख यांनी सर्वधर्मीय लोकांना घेवून यावेळी शेतकरी कामगार पक्ष सांगोला विधानसभा मतदार संघात सर्व ताकतीने निवडणूक लढविणार आहे. डॉक्टर बंधूनी प्रस्थांपितांविरोधात दंड थोपटले असून सांगोला मतदार संघाचे यंदा चित्र बदलणार आहे. येणार्या काळात मतदार संघातील शेतकर्याचे व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेकाप कटीबध्द असून डॉ.बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांचा बहुमताने विजय होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला.
प्रचार शुभारंभप्रसंगी तालुका चिटणीस दादासाहेब बाबर, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक गोडसे, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, समाधान पाटील, रमेश जाधव, गिरीष गंगथडे, शिवाजीराव व्हनमाने, काँग्रेसचे सुनिल नागणे, सरपंच गणेश दिक्षीत, उपसरपंच नामदेव यादव, माणिकराव जरे, आबासाहेब बाबर, अॅड.शंकर सरगर, उल्हास ढेरे, रामभाऊ लवटे, के.एस.ढेरे, वस्ताद भारत भोसले, डॉ.विजयकुमार गायकवाड, नंदकुमार यादव, नागनाथ जरे, कर्नल भानुदास जरे, मेजर पांडुरंग जरे, नितीन जरे, उत्तम जरे, मधुकर ढेरे, बाळासाहेब भोसले, रामचंद्र भोसले, नानासाहेब जरे, सदाशिव ढेरे, संभाजी भोसले, उध्दव ढेरे, पोपट जरे, संतोष जरे, बापूराव यादव, विष्णू यादव, अण्णासाहेब ढेरे, नानासाहेब भोसले, अण्णासाहेब भोसले, नरेंद्र जरे, नेताजी भोसले, रामचंद्र ऐवळे, आबासाहेब ऐवळे, रणजित जरे, अरविंद यादव, अजित ऐवळे, विजय बोडरे, हरीदास फुले, विशाल जरे, विशाल यादव, योगेश यादव,मधुकर पाटील, शंकर बागल, डॉ.अजित भोसले, प्रकाश भोसले, आनंदा भोसले, अविनाश ऐवळे, सचिन ऐवळे, गणेश फुले, प्रणय ढेरे, राहुल ढेरे, दादासाहेब ढेरे, अजित जरे, बाबुराव पाटील, अजय मोरे, नंदकुमार जरे, दिलीप जरे, उत्तम ढेरे, भारत जरे, निलेश भोसले, प्रविण जरे, भाऊसाहेब फुले यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
पाणी नुसत्या गप्पा मारून येत नसते तर पाणी आणण्यासाठी संघर्ष करावा लागतो
उद्याची निवडणूकीकडे विचारांची, निष्ठेची व जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी पहिली पाहिजे. सांगोल्यात आबासाहेबांनी सुसंस्कृत राजकारण केले, जातीपातीला कधीही थारा दिला नाही. पाणी संघर्ष चळवळीमुळे आज आपणाला तालुक्यात पाणी पाहायला मिळत आहे.पाणी नुसत्या गप्पा मारून येत नसते तर पाणी आणण्यासाठी संघर्ष करावा लागतो तो संघर्ष शेकापने केला असून शेतकर्यांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत विधिमंडळात किती प्रश्न उपस्थित केले याचा विचार आपणाला करावा लागणार असून येणार्या काळात सुसंस्कृत राजकारणास साठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.
डॉ.अनिकेत देशमुख, युवा नेते शेकाप
–एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा निधी खर्च केला.….
तालुक्यात स्व.आबासाहेब आणि खवासपूर गावात स्व जगन्नाथ तात्या जरे,स्व मारुती भोसले यांनी एक चांगली दिशा दिली. गावात आर डी गायकवाड सर यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार दिला विकासासाठी जीवाचं रान केल तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बांधरे, विजेचे जाळे, रस्त्याचे जाळे, सहकारी संस्था,सर्व समाजासाठी समाज मंदिरे, वस्ती शाळा,अंगणवाडी,बँक,शेतकर्यांना फळबाग लागवडीसाठी मदत करणे चंद्रभागेच पिण्याच पाणी आणि टेंभू योजनेचे पाणी आणि तालुक्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी जीवनभर काम केल आता या 5 वर्षात मात्र कागदोपत्री विकासाच्या गप्पा मारत एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा निधी खर्च केला असं दाखवलं जातंय,आणि निकृष्ट काम करून जवळच्या चार लोकांचा विकास सध्या सुरु असून गावची,जल जीवन योजना आणि शाळा बांधकाम या मूलभूत ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार करून सर्वासामान्य लोकांची गैरसोय केली आहे. शासकीय कार्यालयात लोकांची अडवणूक केली असल्याचे प्रास्ताविक करताना मधुकर ढेरे व सरपंच गणेश दीक्षित यांनी सांगितले.