कोळे येथील श्री गुरुदत्त महाराज मोफत वाचनालयात सुवसिनिंचा सन्मान सोहळा संपन्न

सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वाचनालयाने महिलांसाठी सुवसिनिंचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी सौ. ताहेरा आतार यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या पोट भरण्यासाठी जेवण बुद्धीचा विकास होण्यासाठी वाचन ही काळाची गरज आहे महिलांनी मोबाईलच्या मोह जाळ्यात अडकलेल्या मुला मुलींना चांगले वाचन साहित्य वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यावे ज्ञान मिळण्यासाठी पुस्तक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे विचारशक्ती वाढते महिलांनी पुस्तकाशी मैत्री करून वाचन केले पाहिजे ते कधीही धोका देत नाही असे त्यांनी उपस्थित यांना आवाहन केले.
यावेळी वाचनालयात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथपाल सौ.सोनल कुलकर्णी यांनी महिलांची ओटी भरून सौभाग्याचं लेणं हळदीकुंकू लावून व प्रसाद देऊन सर्वांना सन्मानित केले.